परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

मानव निर्माण अभियान अंतर्गत विद्यार्थी मानवता संस्कार व्याख्यान :उत्स्फूर्त प्रतिसाद

 मानव निर्माण अभियान अंतर्गत विद्यार्थी मानवता संस्कार व्याख्यान :उत्स्फूर्त प्रतिसाद



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....


वैद्यनाथ इन्स्टीट्यूट ऑफ नर्सिंग व फिजिओथेरपी कॉलेज मध्ये आज मानव निर्माण अभियान अंतर्गत विद्यार्थी- मानवता संस्कार व्याख्यान समारंभ साजरा झाला. गितगायक पं प्रताप सिंहजी चौहान यांचे जागृती गीत प्रेरणा दायी होते मार्गदर्शक आचार्य पं. ओम प्रकाशजी शास्त्री (वाराणसी) हयांचे मनोरंजक असे वयाख्यान उर्जादायी, देशभक्ती, एकता व मानसन्माना चे महत्व पटवून देणारे असे होते. संस्कृत प्रचूरभाषेत अनेक उदाहरणे देऊन त्यांनी भारतीय संस्कार कसे सकारात्मकता शिकविणारे आहेत हे सोप्या भाषेत सर्वांच्या मनावर बिंबवले.


यावेळी  श्री. शेख सर, सौ. गुणप्रिया चोपडे मॅडम, श्री. सतीश सर, श्री. राम होळंबे सर व सर्व नर्सिंग व फिजिओथेरपी चे शिक्षक वृन्द उपस्थित होते. नर्सिंग अँडव्हायजर श्रीमती. ताई परळीकर मॅडम हयांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन कु रंजना पांचाळ यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!