मेरे घर राम आये है..........!

 लोकोत्सव: परळीत राधाकृष्ण महिला भजनी मंडळाने साकारला  आयोध्यातील राममंदिराचा हुबेहूब देखावा




 परळी वैजनाथ , प्रतिनिधी..

           येत्या 22 जानेवारीला अयोध्येत श्रीरामलल्लांची प्रतिष्ठापना होणार आहे. या अनुषंगाने संपूर्ण देशभर राममय वातावरण झाल्याचे बघायला मिळत आहे. विविध उपक्रम, देखावे ,भजन ,संकीर्तन, उत्सव अशा पद्धतीने लोकोत्सव साजरा केला जात आहे. या  पार्श्वभूमीवर परळीतील राधाकृष्ण महिला भजनी मंडळाच्या वतीने मकर संक्रांत हळदीकुंकू कार्यक्रमात  पद्मावती गल्लीत आनंदनगर येथे आयोध्यातील राम मंदिराच्या प्रतिकृतीचा हुबेहूब देखावा सादर करण्यात आला असून हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

           परळीतील राधाकृष्ण महिला भजनी मंडळ हे धार्मिक कार्यात सतत अग्रेसर म्हणून ओळखले जाते. वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम,धर्म आणि संस्कृतीशी जोड घालत उपक्रम राबविणारे मंडळ म्हणून ओळख आहे. येत्या 22 जानेवारीला  होणाऱ्या श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर या मंडळांने राम मंदिराच्या देखाव्याचे आयोजन केले आहे. अयोध्येतील राम मंदिराची  प्रतिकृती निर्माण करण्यात आली आहे. या देखाव्यासमोर मंडळातील सदस्य महिला मंडळांनी विविध वेशभूषा करत रामायणातील अनेक प्रसंग सजीव साकार केले आहेत. या ठिकाणी महिला, नागरिक, रामभक्त देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनीही या देखाव्याला भेट देऊन राधाकृष्ण महिला भजनी मंडळाचा उत्साह वाढवला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !