उदगीर तालुका पत्रकार संघाचे मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

 उदगीर तालुका पत्रकार संघाचे मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर


प्रा.डॉ.सुधीर गव्हाणे व चंद्रचकोर माधवराव कारखाने

यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर



शोध वार्ता गटातून दै.लोकप्रश्नचे उपसंपादक सुशील देशमुख

यांना प्रथम तर शाश्वत विकास वार्ता गटातून तृतीय पुरस्कार


उदगीर । वार्ताहर


उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कार 2022-2023 चे पुरस्कार गुरुवारी (दि.4) जाहीर करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत आणि माजी कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांना वृत्तपत्रक्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच उदगीर येथील जेष्ठ पत्रकार चंद्रचकोर कारखाने यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार असल्याचे संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे, कार्याध्यक्ष एल.पी.उगीले ,स्पर्धा सयोंजक प्रा.प्रवीण जाहुरे यांनी जाहीर केले. तसेच यामध्ये शोध वार्ता गटातून बीड येथील दै.लोकप्रश्नचे उपसंपादक सुशील सुरेश देशमुख यांना प्रथम तर शाश्वत विकास वार्ता गटातून तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गेल्या 14 वर्षापासून मराठवाडास्तरीय उत्कृष्ठ वार्ता ,शोध वार्ता व शाश्वत विकास या तीन गटात पुरस्काराचे आयोजन केले जात पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष आहे.


पुरस्कार पुढीलप्रमाणे शोधवार्ता गट:-

प्रथम पुरस्कार : दैनिक लोकप्रश्नचे बीड येथील उपसंपादक सुशील सुरेश देशमुख यांच्या ‘खरच उद्योजक घडवायचे की,तरुणांना आशेला लावायचय’? या बातमीस जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ रोख पाच हजार रुपये सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, व्दितीय पुरस्कार : दैनिक पुढारीचे चाकूर जिल्हा लातूर येथील प्रतिनिधी संग्राम वाघमारे यांच्या  चाकूर तालुक्यातील 27 जि.प. शाळांचे भवितव्य धोक्यात येणार या बातमीस  वृत्तपत्र विद्या विभाग स्वामी विवेकानंद महाविद्यालय उदगीर यांच्यावतीने  रोख तीन हजार रुपये ,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तृतीय पुरस्कार: दैनिक सकाळचे सिल्लोड प्रतिनिधी सचिन चोबे यांच्या ऑक्सीजन यंत्रणा असुन अडचन नसुन खोळंबा या बातमीस राजकुमार मोगले यांच्यावतीने  कै.व्यंकटराव कलप्पा मोगले यांच्या स्मरर्णार्थ दोन हजार रुपये रोख ,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र .

उत्कृष्ट वार्ता गट:-

- प्रथम पुरस्कार : दैनिक सकाळचे उजनी ता.औसा जिल्हा लातूर येथील  प्रतिनिधी केतन ढवण यांच्या दुभंगून  जाता-जाता अभंग  झालो ! या बातमीस अर्जुन मूद्दा यांच्यावतीने  जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ रोख पाच हजार रुपये ,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र, -व्दितीय पुरस्कार : दैनिक पुण्यनगरीचे शिरुर जि.बीड येथील प्रतिनिधी गोकुळ पवार यांना  मुलाने बसस्थानकावर बेवारस सोडलेल्या बापाला मुलीने स्विकारले बातमीस  वृत्तपत्रविद्या विभाग  स्वामी विवेकानंद महाविद्यालय उदगीर यांच्यावतीने तीन हजार रुपये रोख ,सन्मान चिन्ह  व प्रमाणपत्र.- तृतीय पुरस्कार : दैनिक पुढारीचे किनगाव ता.अहमदपुर जि.लातूर येथील प्रतिनिधी गोरख भुसाळे यांच्या सुट्यांतील मामाच्या गावची ओढ ओसरतेय भाचे कंपनीचा पर्यटनावर;खाजगी शिकवणीचा परिणाम या बातमीस प्रा.प्रशांत अपसिंगेकर यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ 2000/-रुपये रोख,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र

विकास व शाश्वत विकास वार्ता गट:

प्रथम पुरस्कार : दैनिक सकाळचे  फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगरया येथील प्रतिनिधी नवनाथ इधाटे यांच्या महिला कुटुंबालाच नव्हे तर समाजाला दिशा देते या बातमीस गोविंद सावरगावे यांच्यावतीने कै.गुणवंतराव बाजीराव सावरगावे  यांच्या स्मरणार्थ पाच हजार रुपये रोख ,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र ,व्दितीय पुरस्कार :-दैनिक पुण्यनगरीचे  शिरुर जि.बीड येथील प्रतिनिधी गोकुळ पवार  यांच्या खोलेवाडीच्या खव्याचा गोडवा कुंथलगिरीकरांच्या पडला प्रेमात या बातमीस वृत्तपत्र विद्या विभाग स्वामी विवेकानंद महाविद्यालय यांच्यावतीने तीन हजार रुपये रोख ,सन्मान चिन्ह व सन्मानपत्र, तृतिय पुरस्कार: दैनिक लोकप्रश्न (बीड) उपसंपादक सुशील देशमुख  यांच्या ‘जिल्ह्याची भुजल पातळी107 टक्क्यांनी वाढली’ या बातमीस जेष्ठ पत्रकार कै.नागनाथ निडवदे यांच्या स्मरर्णार्थ दोन हजार रुपये रोख,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र असे पारिताषिक जाहीर करण्यात आले आहे.

परीक्षक म्हणून लातूर येथील जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, श्याम टरके, सहाय्यकसंचालक, माहिती,  विभागीय माहिती कार्यालय लातूर, राजर्षी शाहू महाविद्यालय,लातूरचे जनसंवाद विभागाचे प्रा.डॉ.शिवशंकर पटवारी यांनी पाहिले तर जेष्ठ पत्रकार एल.पी.उगीले,जेष्ठ पत्रकार राम हडोळे,डॉ.धनाजी कुमठेकर व प्रा.प्रवीण जाहूरे  या निवड समितीने जीवन गौरव  पुरस्काराची निवड केली आहे. सन2022 व20 23 या  दोन वर्षाचे पुरस्कार वितरण सोहळा लवकरच  होणार आहे.

-----

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !