अंनिस शाखा परळीची कार्यकारिणी जाहीर

 अंनिस शाखा परळीच्या अध्यक्षपदी पी. एस. घाडगे, कार्याध्यक्षपदी रानबा गायकवाड तर विकास वाघमारे यांची प्रधान सचिव पदी निवड

परळी प्रतिनिधी.    अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा परळीचे 2024-  25 या नवीन वर्षाची नूतन कार्यकारणी नुकतीच निवडण्यात आली शाखा परळीच्या अध्यक्षपदी पी एस घाडगे, कार्याध्यक्षपदी रानबा गायकवाड तर प्रधान सचिव पदावर विकास वाघमारे यांची सर्वांनुमते  निवड करण्यात आली.

    काल जिजामाता उद्यानात संपन्न झालेल्या या बैठकीसाठी बीड जिल्हा अंनिसचे कार्याध्यक्ष प्रदीप चव्हाण तसेच प्रधान सचिव गोविंद सोनपीर तसेच प्रधान सचिव  सुकेशनी नाईकवाडे प्रा. दशरथ रोडे, संजीब रॉय उपस्थित होत्या. यावेळी शिक्षक संघटनेचे नेते पी. एस. घाडगे यांच्यावर अनिस शाखा परळीच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. तर उपाध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष वैजनाथ तात्या जगतकर, उपाध्यक्ष अनिल मस्के, कार्याध्यक्ष रानबा गायकवाड, प्रधान सचिव विकास वाघमारे, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह विभाग प्रमुख अशोक मुंडे विविध उपक्रम विभागावर महादेव आजले, वैज्ञानिक जाणीवा विभाग प्राध्यापक एस. बी. जाधव आणि प्राध्यापक प्रवीण बुक्तर, विवेक वहिनी विभाग प्रमुख दीपक शिरसाठ यांचे निवड करण्यात आली.

      याबरोबरच महिला सहभाग विभाग कार्यवाह म्हणून प्रजावतीताई कांबळे, सुनीता नरंगलकर, प्राध्यापक अर्चना चव्हाण, युवा सहभाग विभाग आनंद तूपसमुद्रे, जात पंचायत मूठमाती विभाग कार्यवाह नवनाथ दाने, प्रशिक्षण व्यवस्थापन अरुण जाधव, विवेक जागर प्रकाशन विभाग सि.पी. खंडागळे बालाजी पवार सांस्कृतिक विभाग कार्यवाह राहुल सूर्यवंशी, सोशल मीडिया विभाग विनायक काळे, निधी व्यवस्थापन समितीवर प्राध्यापक डी. जे. वाघमारे, प्राध्यापक विलास रोडे तर कायदेविषयक व्यवस्थापन विभाग एडवोकेट दिलीप उजगरे, एडवोकेट अशोक रोडे, एडवोकेट बुद्धरत्न उजगरे यांची निवड करण्यात आली. या बैठकीस ज्येष्ठ मार्गदर्शक जी एस.सौंदळे उपस्थित होते. बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप चव्हाण व प्रधान सचिव गोविंद सोनपीर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार