उद्यापासून होणार नोंदणी

 'आनंदी घरकुल' प्रकल्प: परवडणाऱ्या घरांसाठी दि. ५ पासुन नोॅदणी; वाल्मिकअण्णा कराड यांच्या हस्ते नोंदणी अभियानाचा शुभारंभ




परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
           ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी शहरात एक महत्त्वकांक्षी गृहप्रकल्प राबवला जात आहे.'आनंदी घरकुल' प्रकल्पांतर्गत परळीत घर नसणाऱ्या, गरजू व सर्वांनाच परवडेल अशी सुसज्ज घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या परवडणाऱ्या घरांसाठी दि.५ ते २० जानेवारीदरम्यान नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे न.प.गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या हस्ते नोंदणी अभियानाचा दि.५ रोजी शुभारंभ होणार आहे.
            राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन गरजूंना हक्काचं छप्पर, कमीतकमी परवडणाऱ्या किंमतीत सुसज्ज १५०० घरांचा गृहप्रकल्प निर्माण करण्यात येणार आहे.परळी शहरांमध्ये ज्यांचं स्वतःचं घर नाही ,जे भाड्याच्या घरात राहतात, नवीन घर घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही, कामगार, श्रमिक, शेतमजूर, विविध उद्योगांमधील मजूर ,असंघटित क्षेत्रातील कामगार, रोजंदारीवर काम करणारे अशा अत्यंत गरजू व घरापासून वंचित राहणाऱ्या समाज घटकांसाठी आपल्या स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने माफक दरात 'आनंदी घरकुल' हा घरकुल प्रकल्प राबवण्यात येणार आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर प्रांगण येथे नोंदणी अभियान राबविण्यात येणार असुन दि.५ जानेवारी रोजी सकाळी १० वा.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे न.प.गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या हस्ते नोंदणी अभियानाचा दि.५ रोजी शुभारंभ होणार आहे.  नोंदणीसाठी केवळ आधारकार्ड आवश्यक आहे. लवकरात लवकर नागरीकांनी आपली नोंदणी करावी. आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उपयुक्त या प्रकल्पाचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तथा 'आनंदी घरकुल' चे प्रकल्प संयोजक बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार