गेवराईत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत :

 गेवराईत मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत :

पन्नास जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी


गेवराई......

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जात असताना गेवराई येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी 51 जेसीबीच्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच त्यांच्या स्वागतासाठी ठीक ठिकाणी कमानी उभारण्यात आल्या होत्या यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.


मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे दिनांक 20 जानेवारी रोजी सराटी अंतरवाली इथून मुंबईकडे जात असताना त्यांचे गेवराई तालुक्यात सायंकाळी पाच वाजता आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी सकाळ पासून च बच्चे कंपनी पासून वृध्दा पर्यंत मराठा समन्वय रस्त्याच्या दुतर्फा ला उभे होते 

ठिकठिकाणी  कमानी उभारण्यात आल्या होत्या.. तसेच मराठा बांधवांनसाठी पाण्याची सोय देखील करण्यात आली होती .गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांचे आगमन झाले यावेळी 50 जेसीबी च्या माध्यमातून त्यांच्यावर पुष्पवष्टी करण्यात आली. महाराजांची आरती झाली व त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शेकडो तोफांची सलामी देखील मनोज जरांगे पाटील  यांना देण्यात आली. एक मराठा लाख मराठा या घोषणेने शहर दणाणून  गेले होते.तसेच मराठा बांधवांसाठी कोळगाव या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून परिसरातील आसपासच्या 50 गावांनी भाजी भाकरी पिठलं अशा जेवणाची 20 ठिकाणी  सोय केली  .तसेच ठिक ठिकाणी पाण्याची देखील सोय करण्यात आली होती तर गेवराई शहरांमध्ये मराठा बांधवांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले .यावेळी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते तर असंख्य गाड्या ताफा त्यांच्याबरोबर . होता. मराठा बांधवांनी आपल्या खाण्यापिण्याची सोय स्वतःच्या गाडीमध्ये सर्व साहित्य घेऊन मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे कूच करत होते. तर एक मराठा लाख मराठा घोषणेने गेवराई शहरात दणाणून गेले होते भगवे झेंडयाने शहरात भगवे वादळ निर्माण झाले होते.


जय जिजाऊ, जय शिवराय च्या घोषणा ने परिसर दणाणून गेला

मनोज जरांगे पाटील आज मुंबई साठी रवाना झाले असून. लाखोंच्या संख्येने मराठा आज एकवटलेला दिसला उन, वारा ची तमा न बाळगता जरांगे पाटील आपल्या गावात येणार या साठी स्वागत करण्यास उत्सुक होते जरांगे पाटील यांच्या आगमनाने नवं चैतन्य संचारले होते ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार लाखो लोक होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार