मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात विजयाताई दहिवाळ समाज भूषण पुरस्काराने सन्मानित




परळी प्रतिनिधी नाथरा येथे संपन्न झालेल्या सातव्या मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात स्वातंत्र्य सेनानी दत्तात्रय दहिवाळ गुरुजी यांच्या कन्या विजयाताई दहिवाळ यांनाप्रा. डॉ. साहित्यिक कथाकार संमेलन अध्यक्ष भास्कर बडे व प्रसिद्ध कवी भारत सातपुते तसेच स्वागत अध्यक्ष डॉ. एकनाथ मुंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

श्रीनाथ मानव सेवा मंडळ, नाथरा संस्थेच्या वतीने पापनाथेश्वर विद्यालय,नाथरा ता.परळी वै.जि.बीड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव निमित्त सातवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन  नुकतेच संपन्न झाले या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.यावेळीपरळीतील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, चित्रकार कलायोगी दहिवाळ गुरुजी यांची कन्या विजयाताई दहिवाळ यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या संमेलनाला उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे,डॉ.भास्कर बडे कोषअध्यक्ष मराठवाडा,सावता परिषद, संभाजीनगर, मा.डॉ.संतोष मुंडे,उपाध्यक्ष दिव्यांग कल्याण मंत्रायल अभियान,महाराष्ट्र राज्य,मा.अभय मुंढे,सरपंच नाथरा,उषाताई दराडे मा.आमदार,बीड,मा. डॉ.एकनाथ मुंढे,अध्यक्ष श्रीनाथ मानव सेवा मंडळ इत्यादी मानवरांच्या उपस्थितीत विजयाताई दहिवाळ समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विजयाताई दहिवाळ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊनकै. आमदार उत्तमराव विटेकर (वीटा) यांच्या नांवाचा "समाजभूषण पुरस्कार,परळी भूषण" पुरस्कार, भारतीय नरहरी सेनेचा समाजभूषण सुवर्ण पुरस्कार,इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा,मराठवाडा साहित्य परिषद सदस्या,महाराष्ट्र सुवर्णकार महिला कमिटी सदस्या लोकमत सखी मंच स्टार प्रतिनिधी  अशा विविध सामाजिक स्तरावर त्यांचे मोठे योगदान राहिल्याने विविध संस्थांकडून त्यांचा गौरव करण्यात येतो पुढेही असेच अविरत सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडो अशी शुभेच्छा सर्व स्तराकडून येत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार