मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थीत व्यंकटेश शिंदे यांचा बीड जिल्ह्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थीत व्यंकटेश शिंदे यांचा बीड जिल्ह्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश


मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे  मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे  यांच्या उपस्थितीत काल बीड जिल्ह्यातील उ बा ठा गटातील नेते व्यंकटेश शिंदे यांनी बीड मधील आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. 

      बीड जिल्हातील ठाकरे गटाला उतरती कळा लागली असून सुषमा अंधारेेंवर  आरोप करत  बंड पुकरणाऱ्या व्यंकटेश शिंदे यांच्या समर्थनार्थ  शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.  राज्याचे  मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे  यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दि. १२ जानेवारी रात्री उशिरा व्यंकटेश शिंदे यांनी आपल्या शेकडो पदाधिकाऱ्या सह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बीड लोकसभा संपर्क प्रमुख डॉ. विजय पाटील, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, अनिल  जगताप, परळी विधानसभा प्रमुख भाऊसाहेब मोरे, शिवसेना शहरप्रमुख वैजनाथ माने उपस्थित होते. उ बा ठा नेते व्यंकटेश शिंदे यांच्या सह माजी उपनगराध्यक्ष  राजा भैय्या पांडे, दीपक शिंदे, संतोष चौधरी, टाकळी ग्रामपंचायत चे सरपंच दत्ता देशमुख, बाबा सोनवणे, मोहन राजमाने,  तुकाराम नरवाडे, उप सरपंच बाळासाहेब शिंदे, नागेश मुरकुटे, पृथ्वीराज उंबरे, गजानन सोळंके, संदीप शिंदे, कृष्णा सुरवसे, शरद  सोनवणे, राजाभाऊ राडकर, सुदर्शन यादव,  उमेश सोळंके, गोविंद गरड, गौरव क्षीरसागर, बालाजी मोरे, राजाभाऊ जाधव, राम सोळंके, विजय गायकवाड, विश्वनाथ पंजरकर, राजेश शिंदे, आकाश अंबिलावादे, गणेश खोडके, विजय लोखंडे, अतुल सुरवसे,  राम काळे, बाळु घाडगे, अजय आवाड, एकनाथ गुट्टे,  राजाभाऊ पांचाळ, अतुल शिंदे, कृष्णा पौळ, सोमनाथ पांचाळ, मुंजा गायकवाड, हनुमान गायवळ, एकनाथ पांचाळ, अमोल साखरे, गजानन थळकरी, बालाजी क्षीरसाठ, संग्राम सोळंके, विशाल शिंदे, अजय आवाड, शाखाप्रमुख ते तालुकाप्रमुख अशा परळी विधानसभेतील सर्व माजी पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !