सा. शिक्षण मार्गचे शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर, शिक्षक साहित्य संमेलनात होणार पुरस्कार वितरण

सा.शिक्षण मार्गचे शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर, शिक्षक साहित्य संमेलनात होणार पुरस्कार वितरण


परळी प्रतिनिधी.    शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या साप्ताहिक शिक्षण मार्ग च्या वतीने देण्यात येणाऱे  शिक्षक गौरव पुरस्कार  जाहीर करण्यात आले आले आहेत. येत्या 11 फेब्रुवारी 2024 रोजी होणाऱ्या मराठवाडा विभागीय शिक्षक साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असल्याचे संयोजन समितीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

      शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक शिक्षिका यांचा शिक्षक गौरव पुरस्कार देऊन शिक्षण मार्गाच्या वतीने सन्मान करण्यात येतो. पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षकांमध्ये मराठवाड्यातील धारुर येथील कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील  प्रा. डॉक्टर नितीन कुंभार, अनुप कुसुमकर, महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय मोहा, श्रीमती वंदना विश्वंभर कराड, जि. प. प्राथमीक शाळा मिरवट, तालुका परळी, प्रा. डॉ.  संतोष रणखांब कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय, सोनपेठ. जिल्हा परभणी. राहुल पोटभरे, जि. प. प्राथमिक शाळा मोहा. तालुका परळी. सिद्धेश्वर इंगोले, शिवछत्रपती विद्यालय परळी वैजनाथ.बीड.

    याबरोबरच प्रा. रवींद्र जोशी, कै. राजीव गांधी अनुसूचित जाती, जमाती, निवासी आश्रम शाळा, खडका जिल्हा परभणी. गणेश खाडे, माध्यमिक आश्रम शाळा, कौडगाव हुडा. तालुका परळी. ललिता धोंडीराम राठोड मुख्याध्यापक, सुधाकरराव नाईक विद्यालय संभाजीनगर, भास्कर दत्तात्रय आंधळे, जि. प. प्राथमीक शाळा. वाघबेट, श्रीमती अनिता गर्जे, जि प माध्यमिक शाळा, परळी वैजनाथ. नंदकिशोर सुरेश जातकर, जि प प्रा शा. टोकवाडी, मधुकर पवार, मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, ढोल उमरी, नांदेड. नसरीन सुलताना सलीम शेख, मिलीया प्राथमिक शाळा धारूर, सौ विनिता विठ्ठल कराड, ज्ञानबोधिनी प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ. हरिश्चंद्र दत्तात्रय सोनवणे, जि प प्राथमीक शाळा, डाबी, अविनाश नेहरकर, जि प प्राथमीक शाळा, नागापूर यांना शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

   परळी येथे 11 फेब्रुवारी 2024 रोजी नाथ टॉकीज रोड, औद्योगिक वसाहत सभागृह, येथे संपन्न होणाऱ्या सहाव्या विभागीय शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक ए.तु. कराड हे आहेत. स्वागताध्यक्ष प्रदीप खाडे तर संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, प्रा. अनिलकुमार  साळवे यांचे हस्ते होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार