नमो ॲपवरून स्पर्धेची नोंदणी ; विजेत्यांना मिळणार २ हजारापासून २१ हजार पर्यंत रोख रक्कमेची बक्षिसं

 परळीत भाजपच्या वतीने 'नमो चषक' स्पर्धेचं आयोजन


१२ जानेवारीला महिलांसाठी रांगोळी, संगीत खुर्ची, रस्सीखेच तर १४ ला मॅरेथॉन, व्हाॅलीबाॅल स्पर्धा


नमो ॲपवरून स्पर्धेची नोंदणी ; विजेत्यांना मिळणार २ हजारापासून २१ हजार पर्यंत रोख रक्कमेची बक्षिसं


परळी वैजनाथ।दिनांक १०।

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं शहरात १२ व १४ जानेवारी रोजी 'नमो चषक' २०२४ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. फक्त मतदारसंघासाठी असणाऱ्या या स्पर्धेतंर्गत येत्या शुक्रवारी महिलांसाठी रांगोळी, संगीत खुर्ची, रस्सीखेच तर रविवारी मॅरेथॉन व व्हाॅलीबाॅल स्पर्धा होणार आहेत.  स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणा-या स्पर्धकांना नमो ॲपवरून ऑनलाईन तसेच ऑफलाईन देखील नांव नोंदवता येणार आहे. 


   भाजपच्या वतीने संपूर्ण राज्यभर नमो चषक २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून युवा मोर्चावर याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शहरात या अंतर्गत विविध स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते कामाला लागले आहेत. जास्तीत जास्त महिला तसेच पुरुष व युवा  स्पर्धकांनी यात सहभाग घ्यावा यासाठी कार्यकर्त्यांची संपर्क मोहिम सध्या सुरू आहे.


*अशा आहेत स्पर्धा अन् बक्षिसं*

-------------

*रांगोळी स्पर्धा* (फक्त महिलांसाठी) हया १२ जानेवारीला   सकाळी ११ वा.अक्षता मंगल कार्यालय येथे होणार आहेत. 

*स्पर्धेचे विषय* - १) प्रभू श्रीराम २) श्रीराम मंदिर, अयोध्या ३) राष्ट्रमाता जिजाऊ ४) छत्रपती शिवाजी महाराज असून विजेत्या स्पर्धकांना *बक्षिस रोख रक्कमेच्या स्वरूपात* - प्रथम : *१५ हजार रू* , द्वितीय : *७ हजार रू*, तृतीय: *५ हजार रू* मिळणार आहेत. स्पर्धकांनी स्पर्धेच्या नांव नोंदणी व इतर माहितीकरिता सुचिता पोखरकर (शहराध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा )  +919011994938 नितिन समशेट्टे +919822478122 यांचेशी संपर्क साधायचा आहे.

     याच दिवशी दुपारी २ ते ५ वा. या कालावधीत जिजामाता गार्डन येथे महिलांसाठी संगीत खुर्ची व रस्सीखेच स्पर्धा होणार आहेत. संगीत खुर्चीसाठी  प्रथम बक्षीस : *५ हजार रू* , द्वितीय : *३ हजार रू*, तृतीय: *२ हजार रू* तर रस्सीखेच साठी प्रथम बक्षीस : *११ हजार रू* , द्वितीय : *५ हजार रू* असणार आहे. नांव नोंदणी व इतर माहितीकरिता डाॅ. शालिनीताई कराड +918329554027   सुचिता पोखरकर (शहराध्यक्ष, भाजपा महिला मोर्चा ) 

मो. +919011994938, चंदाताई ठोंबरे  +919970079782 यांचेशी संपर्क साधावा.

*मॅरेथॉन स्पर्धा* १४ जानेवारीला सकाळी ६.३० वा. पोलीस स्टेशन  येथून सुरवात होऊन  नेहरू चौक, फाऊंडेशन स्कूल, दोस्ती टी हाऊस, पाॅवरलुम रस्ता मार्गे पोलीस स्टेशन येथे समारोप होणार आहे. ही स्पर्धा तीन गटात म्हणजे वय वर्षे १५ पासून ते ज्येष्ठ नागरिक, महिला व मुली अशा सर्वांसाठी खुल्या आहेत. विजेत्या स्पर्धकांना २ हजार ते ११ हजार रू. पर्यंत रोख रक्कमेच्या स्वरूपात बक्षीस दिली जाणार आहेत. नांव नोंदणी व इतर माहितीकरिता आश्विन आघाव +919850422422, प्रा. पवन मुंडे नगरसेवक +919130744444,

प्रशांत कराड  +919822378711,

योगेश पांडकर +919823775044,

विजय दहिवाळ

+919881579188,  यांचेशी संपर्क साधावा.

    याच दिवशी सकाळी १० वा. फाऊंडेशन स्कूलच्या मैदानावर *व्हाॅलीबाॅल स्पर्धा* होणार आहेत. विजेत्या स्पर्धकांना *बक्षिस* - प्रथम : *२१ हजार रू* व द्वितीय : *११ हजार रू* देण्यात येणार आहे. नांव नोदणी व इतर माहितीकरिता 

निळकंठ चाटे (जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा) यांचे संपर्क कार्यालय, शिवाजीनगर परळी विशाल शिवरत्न मुंडे +919923741919

वैद्यनाथ महाविद्यालय, प्रा. रविकांत कराड +919011219977

ज्ञानेश्वर मुंडे +919975089098

गणेश होळंबे +919284083032 यांच्याशी संपर्क साधावा.जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असं आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !