अंबिका भजनी मंडळाने राम लक्ष्मण सीता यांच्या जिवंत देखाव्याने वेधले लक्ष

 अंबिका भजनी मंडळ: राम लक्ष्मण सीता यांच्या जिवंत देखाव्याने वेधले लक्ष



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)दि.22 - अयोध्येत श्रीरामलल्लांची प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने संपूर्ण देशभरात राममय वातावरण झाल्याचे बघायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर परळीतील अंबिका भजनी मंडळाच्या वतीने मकर संक्रांत हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने अंबेवेस येथील श्री काळाराम मंदिर येथे  राम लक्ष्मण सीता यांचा जिवंत देखावा सादर केला.

           

अंबिका भजनी मंडळ हे विविध धार्मिक उपक्रमात अग्रेसर असलेले भजनी मंडळ म्हणून ओळखले जाते. श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर या मंडळांने राम लक्ष्मण सीता यांचा जिवंत देखावा साकारला होता.या ठिकाणी महिला, नागरिक, रामभक्त देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.यावेळी अंबिका भजनी मंडळातील सदस्य,महिला यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !