प्रभू श्रीराम, राजमाता जिजाऊंच्या आकर्षक व सुबक रांगोळ्यांनी उपस्थितांचे वेधले लक्ष!

नमो चषक ; रांगोळी, संगीत खुर्ची, रस्सीखेच स्पर्धेला परळीत महिलांचा  उत्स्फूर्त सहभाग


प्रभू श्रीराम, राजमाता जिजाऊंच्या आकर्षक व सुबक रांगोळ्यांनी उपस्थितांचे वेधले लक्ष!


परळी वैजनाथ ।दिनांक१२।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आज  भाजपच्या वतीने नमो चषक २०२४ अंतर्गत  पार पडलेल्या रांगोळी, संगीत खुर्ची आणि रस्सीखेच स्पर्धेत महिलांचा सळसळत्या उत्साहासह उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. प्रभू श्रीराम, राजमाता जिजाऊंच्या आकर्षक, सुबक व एकापेक्षा एक सुंदर रांगोळ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.


    भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चाच्या वतीने  नमो चषक २०२४ अंतर्गत विविध स्पर्धांना आजपासून सुरवात झाली. जिल्हयात सर्वात प्रथम महिलांसाठीच्या रांगोळी स्पर्धेने याची सुरवात झाली. अक्षता मंगल कार्यालयात झालेल्या रांगोळी स्पर्धेला महिला व युवतींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. प्रभू श्रीराम, अयोध्येतील राममंदिर, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आदी विषय यासाठी देण्यात आले होते, स्पर्धकांनी एकापेक्षा एक सुंदर व हुबेहुब रांगोळ्या काढून लक्ष वेधले. दुपारच्या सत्रात जिजामाता गार्डन येथे रस्सीखेच व संगीत खुर्ची स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडली, महिलांचा मोठा सहभाग व उत्साह यावेळी पहावयास मिळाला. स्पर्धेच्या सुरवातीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद व लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


  स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, नगरसेविका उमाताई समशेट्टी, डॉ. शालिनीताई कराड, महिला मोर्चा शहराध्यक्ष सुचिताताई पोखरकर, शुभांगीताई गित्ते, महादेव इटके,नितिन समशेट्टी, अनिश अग्रवाल, अश्विन मोगरकर, राजेंद्र ओझा, नरसिंग सिरसाट, प्रशांत कराड ,अरुण पाठक, योगेश पांडकर, विजयकुमार खोसे, अश्विन आघाव, चंदाताई ठोंबरे, सारिका कुरील, रेहाना बेगम, राहुल घोबाळे ,मोहन जोशी, पवन मोदानी,प्रीतेश तोतला,ज्ञानेश्वर मुंडे,योगेश मुंडे,नारायण गुट्टे, श्रीकृष्ण मुंडे, विजय दहिवाळ, दिलीप नेहरकर, गोविंद चौरे आदीनी परिश्रम घेतले. 

••••



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार