वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा

 माजलगावच्या गावखेड्यात ५ दिवसापासून बिबट्याचा ‘थरार



रामपिंपळगावात २० बकऱ्यां केल्या फस्त; परिसरात ‘दहशत’

माजलगाव, दि.८(प्रतिनिधी) माजलगाव तालुक्याच्या तब्बल ६ गावखेड्यात गेल्या पाच दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ माजवला आहे. दरम्यान बिबट्याचा गावागावात थरार निर्माण झाला आहे. आज (सोमवार दि.८) रोजी पहाटे रामपिंपळगावात बिबट्याने २० बकऱ्याच्या पिल्ल्यांसह मोठ्या बकऱ्या फस्त केल्या आहेत. वनविभागच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी सकाळीच धाव घेत परिसरात बिबट्याची शोध मोहीम सुरू केली आहे. दरम्यान बिबट्याच्या अस्तित्वाने दहशत पसरली आहे. वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

    माजलगाव तालुक्यातील मंगरूळ नं.१, हरकी लिमगाव, मंगरूळ नं.२, राम पिंपळगाव, सावरगाव, खेर्डा यासह ईतर गावाच्या शिवारात बिबट्या आढळून आला असल्याचा दावा स्थानिक गावातील नागरिक गेल्या ५ दिवसापासून करत होते. मंगरूळ येथे शेतातील वगारु (म्हैस)वरही हल्ला केला होता. परंतु वनविभागाने यावर तात्काळ पाऊले उचलली नाहीत, परिणामी वनविभागाच्या निष्काळजीपणाचा फटका सोमवार दि.८ रोजी रामपिंपळगाव येथे बसला. बिबट्याने याठिकाणी शेतकरी सय्यद रहेमोद्दीन बडेमिया यांच्या गोठ्यातील बकऱ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात २० बकऱ्या मरण पावल्या आहेत.

त्यामुळे सर्वगावात बिबट्याचा थरार निर्माण झाले निर्माण झाला असून लहान मुले घाबरून गेले आहेत. शाळेत जाण्यासाठी किंवा खेळन्यासाठी ही ते घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे.

    दरम्यान गेल्या पाच दिवसात बिबट्या तब्बल ८ ते १० लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी दिसला असल्याचा असा दावा स्थानिक लोकांकडून होत होता. या घटनेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यानी सकाळीच घटनास्थळी धाव घेतली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचारी, चित्ते, पाईक, मसुले, केंद्रे, डी.एस.मोरे वनपाल वडवणी, आर.सी.देवकांबळे, पारखे वाहनचालक सिद्धेश्वर चव्हाण यांनी परिसरात बिबट्याची शोध मोहीम सुरू केली आहे.

----------------------------------------

   वनविभागाकडून  सतर्कतेचा इशारा

● संध्याकाळी एकटे घराबाहेर पडू नये.

● उगड्या जागेवर स्वच्छालय साठी जाऊ नये खाली बसल्या नंतर तो हमला करतो, जास्त तर एकट्या खाली बसलेल्या वेक्ति वर करतो.

● लहान बालकांना घरा बाहेर संध्याकाळी व स्वच्छालय साठी घरा बाहेर पडू देऊ नये.

● शेतात असल्या जनावरांना बंदीस्त कोठा बनवावा जेणे करून ते हल्या पासून बचाव होईल.

● शेतकऱ्यांनी शेतात जाताना गळ्याला मफलर, टॉवेल, जाड रुमाल गुंडाळून जावे, कारण बिबट्या जास्त प्रमाणात मान व गळ्यावर हल्ला करतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार