तब्बल तीस हजार रामभक्त सामील होण्याची शक्यता

 पंचम ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र परळी वैजनाथ लोकोत्सव समितितर्फे २१ जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा


तब्बल तीस हजार रामभक्त सामील होण्याची शक्यता


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कलियुगातील तब्बल साडे पाचशे वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत मूर्त स्वरूपात विराजमान होत आहेत. या अनुषंगाने पंचम ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र परळी वैजनाथ लोकोत्सव समितिच्या वतीने भव्य शोभा यात्रा रविवार दि. २१ जानेवारी रोजी सकाळी  ९:३० वाजता प्रभू वैद्यनाथ मंदिरा परिसरातून निघणार आहे. या सोहळ्यात तब्बल तीस हजार रामभक्त सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सर्व भारतीयांच्या आस्थेचा विषय असलेल्या रामायणामधील अयोध्येतील श्रीराम मंदिरात तब्बल साडे पाचशे वर्षांनी प्रभू श्रीरामांची न्याय व्यवस्थेच्या आदेशानुसार प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने देशभरात एकप्रकारे दिवाळी सारखे वातावरण तयार होत आहे.


या निमित्ताने प्रत्येक रामभक्त आपल्या घरांवर तसेच व्यापारी बांधव आपल्या घरासह दुकानांवर भगवे झेंडे लावून तसेच विद्युत रोषणाई (लायटिंग) करून आनंदोत्सव द्विगुणीत करू शकता. शोभायात्रेत सहभागी होताना शक्यतो भगवे, केशरी, लाल वस्त्र परिधान करावे. काळ्या रंगाचे कपडे टाळावेत. 


व्यापारी बांधवांना विषेश विनंती २१ जानेवारी रोजी योगायोगाने रविवार आहे आणि याच दिवशी शोभायात्रा संपन्न होणार आहे त्यामुळे सर्वांनी शोभायात्रा संपन्न होईपर्यंत व्यवहार स्थगित ठेऊन मोठ्या संख्येने शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन पंचम ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र परळी वैजनाथ लोकोत्सव समितितर्फे करण्यात आले आहे.



शोभा यात्रा मार्ग : प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसर - नेहरू चौक (तळ) - राणी लक्ष्मीबाई टॉवर - बाजार समिती (मोंढा मार्केट) - अग्रवाल लॉज - बस स्टँड - छत्रपती शिवाजी महाराज चौक


लोकोत्सव समितीने आजवर शहरातील वैद्यनाथ विद्यालय (गणेशपार), वैद्यनाथ विद्यालय (मधवबाग), मिलिंद विद्यालय, संस्कार प्राथमिक विद्यालय, मॉडर्न कॉलेज, अभिनव विद्यालय, जिल्हा परिषद कन्या शाळा, महर्षी कणाद विद्यालय, ल. दे. महिला महाविद्यालय, जवाहरलाल नेहरू महाविद्यालय विविध शाळा, महाविद्यालयातही भेटी देऊन झाल्या आहेत. तसेच उद्याही उर्वरित ठिकाणी संपर्क केला जाणार आहे.


महिलांचा लक्षणीय सहभाग

श्री वैद्यनाथ  सेवाभावी भजनी मंडळ, संतश्रेष्ठ गुरुलिंग स्वामी महिला भजनी मंडळ, कालिंका महिला भजनी मंडळ, विठाई महिला भजनी मंडळ, आर्य वैश्य महिला मंडळ, डॉक्टर असोसिएशन, श्री हरिहर महिला भजनी मंडळ, कल्याणकारी महिला भजनी मंडळ, इच्छापूर्ती महिला भजनी मंडळ, शिवकन्या स्वामी महिला भजनी मंडळ, श्री जिव्धेश्वर महिला भजनी मंडळ, श्री शंभु महादेव सेवाभावी भजनी मंडळ, श्री शंभु महादेव महिला भजनी मंडळ, अंबिका महिला भजनी मंडळ, योगा समूह, राष्ट्रीय स्वयंसेवक समिती, सुवर्णकार महिला भजनी मंडळ, राधाकृष्ण महिला भजनी मंडळ, श्री मन्मथ स्वामी महिला भजनी मंडळ, श्री शिवशंकर महिला भजनी मंडळ, मुक्ताई महिला भजनी मंडळ, सुर्वेश्वर महिला भजनी मंडळ, जाणिव बहुउदेशीय सेवाभावी संस्था यासंह विविध सेवाभावी संस्था, भजनी मंडळ, गरबा मंडळ, बचत गटातील महिलांचा लक्षणीय सहभाग असणार आहे.



अक्षता वाटप

आजवर परळी वैजनाथमधील जवळपास 95% भागात अक्षता वाटप झाले आहे. तर परळी वैजनाथ तालुक्यातील ग्रामीण भागातील पांगरी, देशमुख टाकळी, लिंबुटा, कौठळी, बेलंबा, तळेगाव, वाघबेट, संगम, सिरसाळा, जयगाव,हसनाबाद, पाडोळी, औरंगपूर, तपोवन, खामगाव,वाका,रेवली,आ. टाकळी, पोहनेर, डिग्रस,गो.हिवरा, रामेवाडी, जळगव्हाण, बोरखेड, तेलसमुख, पोळ पिंपरी, हिवरा, ममदापूर, गाडे पिंपळगाव,सेलु, कानडी,वडखले, घोडा कोडगाव, साबळा कोडगाव, हुडा कोडगाव, मलनाथपुर, भिलेगाव, परचुंडी, बोधेगाव, कावळ्याचीवाडी , सोनहिवरा, नागपिंपरी, वाघाळा, मांडवा, नंदनज, मालेवाडी, नंदागौळ, हाळंब, दैठणाघाट, गुट्टेवाडी, खोडवा सावरगाव, जिरेवाडी, कनेरवाडी, भोपळा, दादाहरी वडगाव,लोणी, दाऊतपूर, लोणारवाडी, दगडवाडी, वैजवाडी, कासारवाडी, दारावती तांडा, मिरवट, नागपूर, वानटाकळी, मांडेखेल, बहादूरवाडी, अस्वलांआंबा, नाथरा, इंजेगाव, सबदराबाद आदी गावात अक्षता वाटप झाले आहे.











टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !