निवड: हार्दिक अभिनंदन!!!!

 भारत सरकारच्या दुरसंचार सल्लागार समिती सदस्यपदी किरण धोंड



परळी वैजनाथ , प्रतिनिधी... 

       येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते किरण धोंड यांची भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयांतर्गत दूरसंचार सल्लागार समितीवर सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

           भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व बीडच्या लोकप्रिय खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या शिफारशीतून किरण धोंड यांची भारत सरकारच्या दूरसंचार सल्लागार समितीवर नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बाबतचे अधिकृत पत्र दूरसंचार विभागाच्या वतीने किरण धोंड यांना देण्यात आले आहे.  दूरसंचार सल्लागार समितीच्या या पदावर पुढील नविन नियुक्त्या होईपर्यंत त्यांनी कार्यरत राहावे असे या नियुक्ती पत्रात म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षापासून परळीतील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून किरण धोंड सर्वपरिचित आहेत. पक्षाच्या विविध पदाच्या जबाबदाऱ्यावर त्यांनी काम केलेले आहे. भाजपाचे परळी शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कार्यात ते सातत्याने सक्रिय आहेत. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांना भारत सरकारच्या दूरसंचार सल्लागार समितीवर घेण्यात आले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !