मुक्त विद्यापीठाच्या पुरवणी परिक्षा वैद्यनाथ महाविद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर सुरळीत सुरू

 मुक्त विद्यापीठाच्या पुरवणी परिक्षा वैद्यनाथ महाविद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर सुरळीत सुरू




परळी वैजनाथ ता.१० (प्रतिनिधी)

            यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने पुरवणी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यासाठी एकच परिक्षा केंद्र असून ते येथील वैद्यनाथ महाविद्यालयात आहे. या केंद्रावर मंगळवार (ता.०९) पासून पुरवणी परिक्षेस सुरुवात झाली आहे. या परीक्षेला सुरळीतपणे सुरुवात झाली आहे.

                 येथील वैद्यनाथ महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पुरवणी परिक्षेस मंगळवार पासून सुरुवात झाली आहे. वैद्यनाथ महाविद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर बीए, बीकाँम, एम ए, एमबीए, बीबीए अभ्यासक्रमाच्या परिक्षा सुरू झालेल्या आहेत. या केंद्रावर २३ जानेवारी पर्यंत परिक्षा होणार आहेत. या परिक्षा केंद्रावर बुधवारी (ता.१०) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने नियुक्त केलेल्या भरारी पथकाने भेट देवून परीक्षा शांततेच्या वातावरणात सुरळीत पार पडत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भरारी पथकात प्रा. उत्तम कांदे, प्रा अशोक पवार, प्रा डॉ अर्चना चव्हाण सहभागी झाले होते. यावेळी केंद्रसंचालक डॉ बी.के.शेप, प्राचार्य आर डी राठोड उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !