इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

वीरशैव लिंगायत समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा- विकास हालगे

 वीरशैव लिंगायत समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहा- विकास हालगे



परळी वैजनाथ/ प्रतिनिधी

बारा ज्योतिर्लिंगा पैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेले ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथ नगरीत 7 जानेवारी 2024 रोजी संत श्री गुरुलिंग स्वामी मंदिर येथे राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत समाज वधु वर परिचय मेळाव्यात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विकास हालगे, महाराष्ट्र वीरशैव सभा बीड जिल्हा कार्यकारणी सदस्य, वीरशैव विकास प्रतिष्ठान सहसचिव, महाराष्ट्र वीरशैव सभा सचिव परळी वैजनाथ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

मागील अनेक वर्षांपासून, शहरात पंचक्रोशीतील वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने, वीरशैव विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून, महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे  व वीरशैव समाज परळी यांच्या प्रेरणेने, शहरात राज्यस्तरीय भव्यदिव्य वधू वर पालक परिचय मेळावा भव्य दिव्य स्वरूपात मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो. यावर्षीही 7 जानेवारी 2024 रविवारी सकाळी 10 वाजता गुरूलिंग स्वामी मंदिर बेलवाडी येथे हा मेळावा होणार असून या वधु वर परिचय मेळाव्यास सर्व वधूवरांनी आपली नाव नोंदणी करावी तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन विकास हालगे, महाराष्ट्र वीरशैव सभा बीड जिल्हा कार्यकारणी सदस्य, वीरशैव विकास प्रतिष्ठान सहसचिव, महाराष्ट्र वीरशैव सभा सचिव परळी वैजनाथ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या