शिक्षक गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

 शिक्षक गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन



परळी प्रतिनिधी:-

     

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या विभागीय शिक्षक साहित्य संमेलनात देण्यात येणाऱ्या शिक्षक गौरव पुरस्कारासाठी शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक, प्राध्यापकांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

       यापूर्वी पाच शिक्षक साहित्य संमेलने परळी वै येथे यशस्वीरित्या संपन्न झाली आहेत. या संमेलनात उद्घाटन,शिक्षक गौरव पुरस्कार वितरण, कथाकथन, परिसंवाद आणि कवी संमेलन असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. प्रतिवर्षाप्रमाणे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या  उपक्रमशील शिक्षक, शिक्षिकांना 'शिक्षक गौरव पुरस्काराने' सन्मानित करण्यात येणार आहे.

 'शिक्षक गौरव' पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविणाऱ्या शिक्षक, प्राध्यापकांनी आपली माहिती(परिचय पत्र)  पासपोर्ट साईज फोटोसह दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत ranbagaikwadpress1@gmail.com या ईमेल वर पाठवावेत.

अधिक माहिती साठी  

94 20 14 85 38 आणि 98 22 83 66 75  क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिक्षक साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक रानबा गायकवाड व संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार