इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

मराठा आरक्षण विषयी मंगळवारी परळीत बैलगाडी जनजागृती रॅलीचे आयोजन

 मराठा आरक्षण विषयी मंगळवारी परळीत बैलगाडी जनजागृती रॅलीचे आयोजन 


 परळी वैजनाथ (प्रतिनिधी)


       मंगळवार दि. १६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता मराठा आरक्षण विषयी शासनाचे लक्ष वेधण्याकरिता परळी वैजनाथ येथील तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी रॅली काढण्यात येणार आहे.

 मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा विचार करून  शासनाने  सरसकट मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र द्यावे. तसेच प्रशासनाकडून कुणबी नोंदी तपासण्यासाठी हायगायी न करता पूर्ण सहकार्य करावे. या प्रमुख मागण्यांसाठी ही भव्य बैलगाडी रॅली काढण्यात येणार आहे. यामध्ये परळी शहर व तालुक्यातील मराठा समाज बांधव सामील होणार असून हलगी,सुर सनई, संभूळ यासह इतर पारंपरिक वाद्यांचा समावेश या बैलगाडी रॅलीत असणार आहे.


        या रॅली चा मार्ग भाजी मंडई,गणेशपार येथून राणी लक्ष्मीबाई टावर चौक, एक मिनार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,आझाद चौक मार्गे तहसील कार्यालय अशा स्वरूपाची बैलगाडी रॅली काढण्यात येऊन संबंधित मागण्यांचे निवेदन तहसीलदार, परळी वैजनाथ यांना देण्यात येणार आहे.

 मंगळवारी होत असलेल्या या भव्य बैलगाडी रॅलीस परळी शहर व तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!