दुर्दैवी नकोशी : सहा महिन्यांच्या चिमुकलीस पिशवीत बांधून रस्त्यावर फेकले

 दुर्दैवी नकोशी : सहा महिन्यांच्या चिमुकलीस पिशवीत बांधून रस्त्यावर फेकले


परळी वैजनाथ : एमबी न्युज वृत्तसेवा

आजही समाजात मुलींना नाकारण्यात येत असून मुलगी नकोशी झाली असल्याची विचार परिस्थिती अनेक घटनात्मक दिसून येते अशाच प्रकारची दुर्दैवी घटना एका नकुशी बरोबर घडली आहे सहा महिन्याच्या अवघ्या वयोमानातील या चिमुकलीस चक्क एका पिशवीत बांधून सुनसान रस्त्यावर फेकून देण्याची घटना उघडकीस आल्याने परळी व परिसरात या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान पोलिसांच्या तत्परतेने या मुलीचा जीव वाचला आहे

        परळी वैजनाथ येथून जवळच असलेल्या मालेवाडी रस्त्यावर सहा महिन्याच्या चिमुकलीला पिशवीत बांधून रस्त्यावर फेकून दिल्याची संतापजनक घटना सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास उघडकीस आली आहे. मालेवाडी गावाच्या रस्त्यावर  पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये  लाल बेडशीटमध्ये गुंडाळलेले जिवंत मूल असल्याची माहिती  सोमवारी रात्री ८ वाजता परळी ग्रामीण पोलिसांना फोनवरून कळाली. लागलीच पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते, पोलीस कर्मचारी सुनील अन्नमवार हे घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केले असता सहा ते आठ महिन्यापूर्वी जन्मलेली मुलगी त्यामध्ये आढळून आली. 


            या चिमुकलीस पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर अधिक उपचारासाठी चिमुकलीस अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद  तीर्थ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार