उध्दव ठाकरे यांना शत्रूंची आवश्यकता नाही सुषमा अंधारेच पुरेशा आहेत - व्यंकटेश शिंदे

 उध्दव ठाकरे सेनेले पुन्हा खिंडार:53 पदाधिकाऱ्यांचा 12 जानेवारीला होणार शिंदे गटात प्रवेश - सचिन मुळूक


उध्दव ठाकरे यांना शत्रूंची आवश्यकता नाही सुषमा अंधारेच पुरेशा आहेत - व्यंकटेश शिंदे


परळी (प्रतिनिधी): बीड जिल्हा शिवसेनेतील ठाकरे गटात पदाधिकाऱ्यांनी सुषमा अंधारे विरोधात बंड पुकारले होते. मागिल महिन्यात प्रसार माध्यमां समोर राजीनामे देत उध्दव ठाकरे जवळ आपली नाराजी व्यक्त केली होती. बीड जिल्ह्यात सुषमा अंधरेना डोई जड वाटणाऱ्या पदाधिकाऱ्यांना काल पक्षातून काढण्यात आले. वर्षानुवर्षे निष्ठेने कार्य करणाऱ्या शिवसैनिकांची हकालपट्टी केली ही बाब शिवसैनिकांना काही रूचली नाही. सुषमा अंधारे च्या मनमानी कारभाराला वैतागलेल्या शिवसैनिकांची विचारपूस करण्याचे कष्ट ठाकरे ना घ्यावे वाटले नाही. सामना मधून करण्यात आलेल्या हकालपट्टी संदर्भात उध्दव ठाकरे विषयी बीड जिल्हातील शिवसैनिकांच्या मनामध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. 

अंधारेच्या मनमानीला कंटाळून परळी अंबाजोगाई माजलगाव व वडवणी तालुक्यातील उ.बा.ठा.चे 53 पदाधिकारी व शेकडो शिवसैनिकांनी तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचे निश्चित केले

      ठाकरे गटातील नाराज शिवसैनिकांनी आज परळी येथे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. परळीचे दुसऱ्या पिढीचे शिवसैनिक मा. तालुका प्रमुख तथा नगरसेवक व्यंकटेश शिंदे आंबेजोगाई शहर प्रमुख गजानन मुंडेगावकर व माऊली गोंडे तालुका समन्वय वडवणी यांनी ठाकरे नी आपल्या वर केलेल्या अन्यायाला वाचा फोडली.उध्दव ठाकरे यांना शत्रूंची आवश्यकता नाही सुषमा अंधारे उध्दव ठाकरे ना संपवायला एकट्या पुरेशा आहेत अशी भावना प्रसार माध्यमां समोर व्यक्त केली. परळी तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचा 12 जानेवारीला वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खऱ्या शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी दिली यावेळी जिल्हा संघटक योगेश नवले , माजलगाव उपजिल्हाप्रमुख नितीन मुंदडा अंबेजोगाई तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे, नारायण कुरुंद, शिवसेना शहर प्रमुख वैजनाथ माने गजानन मुडेगावकर राजा भैय्या पांडे माऊली गोंडे उपस्थित होते. 

       परळी विधानसभा प्रमुख राजा भैय्या पांडे व केज विधानसभा समन्वयक दत्ता बोडखे यांनी दिले राजीनामे

   उ.बा.ठा. गटाने सामनातून आजच नियुक्त करण्यात आलेले परळी  विधानसभा प्रमुख राजा भैय्या पांडे व केज विधानसभा समन्वयक दत्ता बोडखे या दोन पदाधिकाऱ्यांनी बारा तासाच्या आत परळी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आम्ही आपल्या पदाचा राजीनामा देत आहोत असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीरपणे सांगितले सांगितले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार