राष्ट्रीय सेवा योजनेच्या +२ स्तराच्या वतीने लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी साबणे उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्काराने सन्मानित

 राष्ट्रीय सेवा योजनेच्या +२ स्तराच्या वतीने लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी साबणे उत्कृष्ट स्वयंसेविका पुरस्काराने सन्मानित


परळी वैजनाथ दि.०६ (प्रतिनिधी)

          शिक्षण संचलनालय पुणेच्या वतीने एक उत्कृष्ट स्वयंसेविका व उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी यांची निवड करण्यात येते. २०२२-२३ या वर्षात लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी शिवाजी साबणे हिची निवड करण्यात आली. याचा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवारी (ता.०५) पार पडला. यामध्ये श्रावणीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

               शिक्षण संचालनालय पुणे यांच्या वतीने दरवर्षी राज्यातील सर्व विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातून एक उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी व एक उत्कृष्ट स्वयंसेविका निवडली जाते. हे पुरस्कार राष्ट्रीय सेवा योजनेच्या +२ स्तरावरील राज्यस्तरीय शिबीरात वितरण केले जाते. यंदा शिक्षण संचालनालय पुणे व शिक्षण संचलनालय विभाग अमरावतीच्या वतीने विवेकानंद आश्रम हिवरा (ता.मेहकर, जिल्हा बुलढाणा) येथे ३ ते ५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले होते. या राज्यस्तरीय शिबीरात छत्रपती संभाजी नगर विभागातील ५ विद्यार्थी व कार्यक्रमाधिकारी , जिल्हा समन्वयक श्री सोनवणे,विभागीय समन्वयक श्री मोगल असे ७ जण सहभागी झाले होते. यामध्ये शहरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा प्रविण फुटके, विद्यार्थी नेतल शर्मा, संध्या सातपुते, श्रावणी साबणे सहभागी झाले होते. शिबीरात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला. २०२२-२३ या वर्षातील उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून लक्ष्मीबाई देशमुख महिला कनिष्ट महाविद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी साबणेला अमरावती विभागाचे सहाय्यक संचालक श्री काळूसे, विभागीय समन्वयक प्रा विशाल जाधव यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी नगर विभागाचे विभागीय समन्वयक प्रा.मोगल, जिल्हा समन्वयक प्रा मेंगडे, प्रा सोनवणे उपस्थित होते. श्रावणीला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे मार्गदर्शक अनिलराव देशमुख, अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रविंद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार