श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण वाकडे, उपाध्यक्ष संजय गोरे, तर सचिव सचिन मुंदडा

 श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण वाकडे, उपाध्यक्ष संजय गोरे, तर सचिव सचिन मुंदडा 


परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः- 

नागरी सहकारी पतसंस्थेच्या क्षेत्रात परळी वैजनाथ तालुक्यात अग्रगण्य असलेल्या व परळीतील जुनी पतसंस्था म्हणून ओळख असलेल्या श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण वाकडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी श्री वाकडे यांनी या पतसंस्थेवर सचिव म्हणून दीर्घकाळ काम केले आहे.

संस्थेच्या बिनविरोध निवडल्या गेलेल्या नुतन संचालकांची बैठक नुकतीच सहकार विभागाचे अधिकारी निवडणुक निर्णय अधिकारी एस के चव्हाण व श्री भद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी श्री स्वामी समर्थ नागरी संस्थेच्या नुतन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी संजय प्रभाकरराव गोरे व सचिवपदी सचिन ब्रिजलालजी मुंदडा यांची निवड करण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक पवनकुमार जैस्वाल, सौ.सुनीता वाघमोडे, श्रीकांत दामा, बालाजी जातकर, रमेश बागवाले, सौ.सुमन चव्हाण, सौ.सुवर्णा जंगले, सौ.विद्या मुंडलिक आदी संचालक उपस्थित होते. या निवडीनंतर नुतन पदाधिकार्‍यांचे उपस्थित संचालक व कर्मचार्‍यांच्या वतीने स्वागत करुन सत्कार करण्यात आला. संचालकांनी आपल्यावर मोठ्या विश्वासाने सोपवलेली जबाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडू असे आश्वासन नुतन अध्यक्ष लक्ष्मण वाकडे यांनी यावेळी दिले. वीस वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेकडे सुमारे तीन कोटी रुपयांच्या ठेवी असून कर्ज दोन कोटी आहे. विविध बँकांमध्ये नव्वद लाखावर गुंतवणूक आहे. यावेळी व्यवस्थापक प्रकाश चव्हाण, लिपिक बसवेश्वर खोत, पिग्मी एजंट प्रदिप राठोड, राजेश शेटे, विष्णु लिखे व वैजनाथ चव्हाण उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार