बीडमध्ये भुकंप नव्हे, भुगर्भातील आवाज; घाबरू नका, जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 बीडमध्ये भुकंप नव्हे, भुगर्भातील आवाज; घाबरू नका, जिल्हा प्रशासनाचे आवाहन




बीड, दि.6 (प्रतिनिधी) :- बीड जिल्ह्यातील बीड, गढी, गेवराई भागात मंगळवारी रात्री झालेल्या गुढ आवाजाने खळबळ माजली आहे. अशातच सदरच्या आवाजाचा भूकंपाशी संबंध नसून पाणी पातळी खालावल्यामुळे कधी कधी भूगर्भातून असे आवाज येतात, सदरील भुकंप नसून भुगर्भातील आवाज आहे, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बीड शहरात मंगळवारी रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी मोठा आवाज झाला. त्यामुळे खिडक्या, घराचे दरवाजे हादरली व भांडी पडली. अनेकांना भूकंप असल्याचे जाणवले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, सदरचा प्रकार भूकंप नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लातूरच्या भूकंप निरीक्षण केंद्रात कोणत्याही भूकंपाची नोंद झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पाणी पातळी खालावल्याने जमिनीत निर्वात पोकळी निर्माण होते आणि त्यामुळे असे काही आवाज येऊ शकतात. तरी जनतेने घाबरुन जाऊ नये असे आवाहन बीड जिल्हा प्रशासनाने केले आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !