पंचवटी नगर मध्ये वृक्षारोपण करून महिला दिन साजरा

 पंचवटी नगर मध्ये वृक्षारोपण करून महिला दिन साजरा: वृक्ष जोपासण्याचीही घेतली जबाबदारी


विविध क्षेत्रात महिलांनी घेतलेली आघाडी कौतुकास्पद - प्रा. पवन मुंडे



परळी वैजनाथ प्रतिनिधी

       महिलांनी प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये नवनवीन विक्रम करून वेगळी ओळख निर्माण केली आहे कोणत्याही क्षेत्रात महिला कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे असे सांगत  महिलांनी संपादन केलेले यश हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त आज पंचवटी नगर मध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मुंडे बोलत होते.

       महिला दिनाचे औचित्य साधून भाजपाच्या कार्यकर्त्या चंदाताई ठोंबरे यांनी पंचवटी नगर मध्ये वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या ठिकाणी वृक्षाचे रोपण केल्यानंतर प्रत्येक वृक्ष  जोपासण्याची जबाबदारी या भागातील महिलांनी घेतली आहे. यावेळी बोलताना प्रा. पवन मुंडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे योगदान मोठे आहे. सैन्यामध्ये सुद्धा अतिशय मोठमोठ्या पदावर महिलांची नियुक्ती झाली असून त्या महिला आघाड्या सांभाळत आहेत. अंतराळात सुद्धा महिलांनी पाऊल ठेवले आहे तर सध्या राष्ट्रपतीपदही महिलेकडे आहे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आघाडी घेतली असून त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे असे म्हणत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

        याप्रसंगी झाडे लावा व झाडे जगवा हा संदेश देत पंचवटीनगर मध्ये वृक्षारोपण केले. यावेळी  उपस्थित उपस्थित महिलांनी प्रत्येकी दोन वर्षाचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेतली. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या चंदाताई ठोंबरे यांचेही यावेळी भाषण झाले. या कार्यक्रमाला पंचवटी नगर भागातील सविता बुरटे, गंगा गीते, शकुंतला कोयनरी, निशा मोरे, प्रतिभा सावजी, अलका सरवदे, सरस्वती निळे, पूजा ममदापुरे, रिटा लोढा, सुप्रिया कटके, मंगला देवशटवार, प्रियंका देवशटवार, महादेवी ममदापूरे, राजश्री डुबे, रजनी लड्डा, संतोषी लाहोटी, सौ. खाकरे, संगीता भाले यांच्या सह पंचवटी व बाजीप्रभू नगर भागातील महिला उपस्थित होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !