नांदेड-पनवेल गाडीच्या बोगींची संख्या वाढवून परळी मार्गे ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची महाव्यवस्थापकाकडे मागणी-जी.एस.सौंदळे

 नांदेड-पनवेल गाडीच्या बोगींची संख्या वाढवून परळी मार्गे ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची महा व्यवस्थापकाकडे मागणी-जी.एस.सौंदळे



परळी वैजनाथ।दिनांक१4।

  द्वादश पंचम ज्योतीर्लिंग क्षेत्र परळी मार्गे पुणे- पनवेल जाणा-या नांदेड एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या प्रवाशी व स्लीपर तसेच ए.सी.बोगींची संख्या तात्काळ वाढवून या रेल्वेने दाटीवाटीने प्रवास करणा-या प्रवाशांची गैरसोय तात्काळ दुर करून परळी मार्गे पुणे,मुंबई,नागपुर,तिरूपती,अयोध्या,वाराणसी,गोवा व ईतर ठिकाणी रेल्वे सुरू करण्याची मागणी दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे महाव्यवस्थापक श्री.अरूणकुमार जैन  परळी रेल्वे स्थानक येथे तपासणीनिमित्त गुरूवार दि.14 मार्च रोजी आले असताना रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष जी.एस.सौंदळे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व प्रवाशांच्यावतीने करण्यात आली.

   नांदेड-पनवेल रेल्वेगाडी च्या बोगी वाढवण्याच्या मागणीसह प्रवासी जनतेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने काही महत्वपूर्ण मागण्या निवेदनात करण्यात आल्या यामध्ये

1)मछलीपट्टणम -बीदर, सिकंद्राबाद-बीदर इंटरसिटी,यशवंतपुर-बीदर एक्सप्रेस,पाटणा-पूर्णा,रायचूर-परभणी रेल्वे परळी-वैजनाथ पर्यंत त्वरीत विस्तारीत करावी.

२) मौजे अंबलटेक येथे रेल्वे क्राॅसिंग साठी नवीन स्थानक बांधणे. 

3) 'पूर्णा-परळी' रेल्वे परत जाताना बहुअंशी रिकामीच  असते त्या ऐवजी ती लातूर- धाराशिव किंवा उदगीर-बीदर पर्यंत विस्तारित करावी. 

4) क्राॅसिंगच्या निमित्ताने घाटनांदूर,वडगाव (निळा) इत्यादी स्टेशन वर विविध गाड्या विनाकारण अधिक वेळ खोळंबून ठेवू नयेत यासह ईतर मागण्या करण्यात आल्या यावेळी नगरसेवक चेतन सौंदळे,अनिल अष्टेकर,विकास हालगे,सौ.सुचिता पोखरकर,मानवत रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष के.डी.वर्मा,प्रकाशसिंह तुसाम,गोपाळ अघाव,कैलास तांदळे,अनिरूध्द जोशी,सुनील आदोडे,रमाकांत बुरांडे,श्रीधर गुट्टे आदिंची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !