वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. पी एल कराड यांची बिनविरोध निवड

 वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.पी. एल. कराड यांची बिनविरोध निवड



 परळी प्रतिनिधी---जवहार शिक्षण संस्थेच्या वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ.पी एल कराड यांची मा. नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मा.वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली  बिनविरोध निवड प्रक्रिया करण्यात आली.यासाठी आज दि.12/03/2024 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी श्री एन एन पंडित सहकार अधिकारी ,सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली वैद्यनाथ कॉलेज कर्मचारी पतसंस्थेच्या कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रा डॉ. पी एल कराड यांची संचालकांच्या माध्यमातून सर्वानुमते अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष  श्रीराम मुंडे, सचिव उमेश वाघुळकर, संचालक प्रा.उत्तम कांदे,डॉ व्हीं बी गायकवाड, प्रा. गणेश चव्हाण, श्रीमती सुनिता धर्माधिकारी, रमेश जाधव, नरेश साखरे, कर्मचारी श्री सूर्यकांत कदम यांची उपस्थिती होती.या निवडीबद्दल जवहार एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकारी व संचालक मंडळांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. आर डी राठोड यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्त्तर कर्मचारी यांनी डॉ.पी एल कराड यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !