इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

महाशिवरात्रीचे औचित्य; प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा उपक्रम

 परळीत हजारो भाविकांनी घेतले बर्फाचे शिवलिंग अमरनाथजींचे दर्शन



महाशिवरात्रीचे औचित्य; प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा उपक्रम


परळी वैजनाथ/प्रतिनिधी

महाशिवरात्रीनिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी बर्फाचे शिवलिंग श्री अमरनाथजींचे दर्शन घेतले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी 8 वा. मान्यवरांच्या हस्ते बर्फाचे शिवलिंग श्री अमरनाथजींची पुजा व आरती करण्यात आली.  यावेळी भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.परळी शहरात पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे मंदिर असून महाशिवरात्रीचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील पंचवटीनगर, जुने पावर हाऊसच्या समोर, वैद्यनाथ मंदिर रोड येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 मार्च रोजी बर्फाचे शिवलिंग  अमरनाथजींचे दर्शन भाविक भक्तांनी घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या