इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचा उत्तम आदर्श म्हणजे यशवंतराव चव्हाण होय-प्रा. डॉ. विनोद जगतकर

महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचा उत्तम आदर्श म्हणजे यशवंतराव चव्हाण होय-प्रा. डॉ. विनोद जगतकर



मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संलग्नित यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आंबेजोगाई येथे याच वर्षापासून यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफत असताना  प्रमूख व्याख्याते म्हणून डॉ. जगतकर यांनी वरील विचार मांडले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट , उपप्राचार्य शिंदे, उपप्राचार्य जाधव, व्याख्यानमालेचे संयोजक प्रा.घोडके, डॉ. मुकुंद राजपंखे इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कारकिर्दीचा आढावा घेत असताना डॉ जगतकर म्हणाले, *यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत त्यांचे योगदान अत्यंत अमूल्य असून त्यांनीच या राज्याच्या विकासाचा सर्वांगीण पाया रचलेला आहे. शेतीचे औद्योगीकरण, जलसिंचन, नवीन उद्योगांची उभारणी, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाची स्थापना, नव बौद्धांना अनुसूचित जातीच्या सवलती, इतर मागासवर्गीयांसाठी सवलती, असे अनेक राज्याच्या विकासावर दुरगामी परिणाम करणारे निर्णय त्यांनी घेतले*. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट म्हणाले, *आमच्या महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण यांचे नाव दिले गेले हे आमच्यासाठी अत्यंत गौरवास्पद आहे. या नावाची प्रतिष्ठा आम्ही जोपासण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत*. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.अहिल्या बरूरे यांनी तर आभार प्रदर्शन व्याख्यानमालेचे संयोजक डॉ. घोडके यांनी केले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!