परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

ऋषी बोधोत्सवात हुलगुंडे यांचे विचार

महर्षी दयानंदांमुळे शिवरात्र "बोधरात्र" ठरली !


ऋषी बोधोत्सवात लक्ष्मणराव हुलगुंडे यांचे विचार

              परळी वैजनाथ, दि.१२-

                               प्रखर आध्यात्मिक जिज्ञासा व सत्यज्ञानाच्या बळावर थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांनी परंपरागत शिवरात्रीला बोधरात्रीत रूपांतरित केले व समग्र विश्वाला निराकार व सर्वव्यापी अशा सत्य शिवाचे दर्शन घडविले. म्हणूनच त्यांच्यामुळे  महाशिवरात्र ही ऐतिहासिक "बोधरात्र" ठरली, असे विचार वैदिक शास्त्रांचे अभ्यासक श्री लक्ष्मणराव हुलगुंडे (आर्य) गुरुजी यांनी व्यक्त केले. 

              येथील आर्य समाज मंदिरात नुकताच ऋषी बोधोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून श्री हुलगुंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मधुसूदन काळे हे होते.  यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री जुगलकिशोर लोहिया, कोषाध्यक्ष देविदासराव कावरे व्यासपीठावर उपस्थित होते. 

          आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात श्री हुलगुंडे आर्य यांनी महर्षी दयानंदांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी महाशिवरात्री दिनी शिवमंदिरात घडलेला प्रसंग कथन केला . यावेळी ते म्हणाले - स्वामी दयानंद यांच्या जागृतीमुळे समग्र विश्वात आध्यात्मिक व सामाजिक क्रांती घडली.  जीवनभर अपार ज्ञानसाधना व  पुरुषार्थ करून  जगासमोर त्यांनी हजारो वर्षांपासून व्यापलेला अज्ञान व अविद्येचा काळोख संपविला आणि  सर्वांना एकमेव अशा कल्याणकारी शिव भगवंताचे दर्शन घडविले. या घटनेपासून प्रेरणा घेत  जिज्ञासू  अभ्यासकांनी नानाविध अंधश्रद्धा, रूढी, परंपरा व अविद्येपासून दूर राहावे. आपला विवेक जागृत करावा व  सत्यज्ञानाचा बोध घ्यावा. कारण शाश्वत सुखासाठी  सत्यज्ञानाची ज्योत प्रज्वलित ठेवत प्रयत्नशील राहणे  यालाच जागृत राहणे म्हणतात, असेही श्री हुलगुंडे यांनी म्हटले . 

          अध्यक्षीय समारोपात डॉ.मधुसूदन काळे यांनी महर्षी दयानंदांच्या वैश्विक स्वरूपातील ऐतिहासिक अशा आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक व  मानवकल्याणकारी कार्याचा गौरव केला. याच कार्यक्रमात एस. टी. महामंडळाच्या परळी आगारातून कंट्रोलर पदावरून श्री रमेश भंडारी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

           प्रारंभी डॉ.श्री वीरेंद्र शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली  यज्ञ संपन्न झाला.  नंतर  ईश्वरीय संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ. सोनाली तिवार यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम पार पडला. यात चि. श्लोक, कु. स्वरा, सुरभी त्रिवार यांनी भक्तीगीते सादर केली. तसेच अनुव्रत चव्हाण, आरुष भायेकर सार्थक गित्ते, डॉ. हर्षा भायेकर,  सौ.विजया भंडारी , सौ.दीक्षा चव्हाण यांनी यावेळी विचार मांडले. याच कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांचा सत्कार करण्यात आला.

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सौ. मनीषा आचार्य यांनी केले, तर आभार प्रा. डॉ.अरूण चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास जयपाल लाहोटी, प्रशांतकुमार शास्त्री, रवींद्र राठौर, कर्ममुनी, गोवर्धन चाटे, ओमप्रकाश भंडारी, लिंबाजी कदम , योगीराज भारती, रमेश भंडारी, दिलीप दीक्षित, डॉ.नयनकुमार आचार्य, अरविंद घोडके आदींसह महिला व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!