शेतक-यांनी आधार लिंक करावे

 प्रधानमंत्री पीक विमा योजना सोयाबीन पीक विमा अग्रिमसाठी शेतक-यांनी आधार लिंक करावे




     बीड, दि. 12 (जि. मा. का.)   प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत जिल्हयातील एकूण 86 महसूल मंडळात सोयाबीन पिकासाठी अग्रिम मंजूर करन्यात आला आहे. त्यापैकी पहिल्या टप्यातील 241 कोटी पैकी 237 कोटी रुपयांचे वाटप लाभार्थीच्या खात्यात करण्यात आले आहे.


     यातील जवळपास सोडेतीन हजार लाभार्थीचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे 2.72 कोटी रुपये लाभार्थीच्या खात्यात वर्ग होऊ शकले नाहीत. अशा सर्व लाभार्थीच्या याद्या गाव व तालुका पातळीवर देण्यात आला आहेत. ज्या शेतक-यांचा सोयाबीन विमा अग्रिम मिळाला नसेल त्यांनी आपल्या गावच्या कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा व आपले आधार बँक खात्याशी सलग्न करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी केले आहे.


       दुस-या टप्प्यातील 1 लाख 5 हजार शेतक-यांचे एकूण 72.14 कोटी रुपयाच विमा हप्ता गुरुवार पर्यंत जमा होतील असे दि. 10 मार्च 2024 रोजी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत विमा कंपनीने अश्वासित केले.


                                                                *******

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार