महाशिवरात्र पर्व: संपुर्ण छायाचित्रे,व्हिडिओज् व सविस्तर बातमी

'नमामि वेद्यनाथम्' च्या जयघोषात वैद्यनाथनगरी दुमदुमली :महाशिवरात्र पर्वकाळात वैद्यनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची विक्रमी गर्दी 

परळी वैजनाथ,:

       येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांची काल (७) गुरुवारी रात्रीपासूनच विक्रमी गर्दी पहायला मिळाली.हर हर महादेव! प्रभू वैद्यनाथ महाराज की जय! अशा जयघोषाने वैद्यनाथ मंदिर परिसर दुमदुमून गेला. देशाच्या कानाकोपऱ्यातून व  महाराष्ट्र राज्य, परराज्यासह ग्रामीण भागातील भाविकांनी महाशिवरात्रीला दर्शनाचा लाभ घेतला. पाच लाखाच्यावर भाविकांनी वैद्यनाथप्रभुंचे दर्शन घेतले. महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ देवस्थान व पोलीस प्रशासनाने नेहमीप्रमाणेच अत्यंत चांगली सुविधा देण्यासोबतच पोलीसांनी कडक पोलीस बंदोबस्तही ठेवला होता.

       महाशिवराञीच्या महापर्व काळात लाखो शिवभक्तांनी श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा,गुजरात, मध्य प्रदेश येथील  भाविक परळीत मोठ्या प्रमाणात दाखल झाले. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शानासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली. महाशिवरात्र उत्सवामुळे परळी शहर गजबजले आहे. वैद्यनाथ मंदीरात काल रात्री 12 पासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली.  आला.

         महाशिवरात्रीनिमित्त दर्शन घेण्यासाठी श्री वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी महिला व पुरुष अशा दोन वेगळ्या रांगा तसेच पास धारकांची स्वतंत्र रांग  अशी दर्शनव्यवस्था करण्यात आली होती. ही रांग वैद्यनाथ मंदिर पासून नगरपरिषद कार्यालयापर्यंत गेली होती. महाशिवरात्रीच्या अनुषंगाने श्री वैद्यनाथ मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली. रंगरंगोटी करण्यात आली आहे. आकर्षक पुष्प सजावट करण्यात आलेली आहे.पायऱ्यावर बॅरिकेटची सोय करण्यात येऊन मंडप उभारण्यात आला आहे. 

          दरम्यान, हर हर महादेव चा जयघोष करीत गुरुवारी मध्यरात्री पासून आज सायंकाळपर्यंत जवळपास 5 लाखांच्यावर भाविकांनी श्री वैद्यनाथाचे दर्शन घेतले अशी माहिती श्री वैजनाथ मंदिराचे सचिव प्रा.बाबासाहेब  देशमुख यांनी दिली.  मंत्री धनंजय मुंडे,भाजपा राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी  दर्शन घेतले. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शासकीय महापुजा करण्यात आली.

         महाशिवरात्रीच्या दिनी आज शुक्रवारी (दि.८) रोजी भविकांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी मोठी रिघ लावली आहे. राज्यासह सीमावर्ती भागातील शेकडो भाविक  परळी शहरात दाखल झाले आहेत. परळी नगरीत येणाऱ्या भाविकांच्या सेवेकरिता शहरातील अनेक सामाजिक संघटना यांनी उपवासाच्या फराळाची, पिण्याच्या पाण्याची जागोजागी मोफत सोय उपलब्ध केली. मंदिर परिसरात जागोजागी भाविकंाचे जथ्थे दिसत असतांनाच रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी सामाजिक व राजकीय संस्थांनी भाविकांसाठी मोफत पाणी व खिचडी वाटपाचे स्टॉल ठेवले होते. 
























*महाशिवरात्री पर्व:कृषीमंत्री धनंजय मुंडे मध्यरात्री वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक



शेतकरी-कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी नांदू द्या - मुंडेंची प्रार्थना*

परळी वैद्यनाथ (दि. 08) - राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज महाशिवरात्री निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभु वैद्यनाथांचे मध्यरात्रीनंतर उशिरा मनोभावे दर्शन घेतले. 

आज सर्व दूर महाशिवरात्रीचे पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जात असून धनंजय मुंडे यांनी रात्री उशिरा वैद्यनाथांचे दर्शन घेत राज्यातील शेतकरी कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी नांदू द्या अशी प्रार्थना प्रभू वैद्यनाथांच्या नाथांच्या चरणी केली. 

दरम्यान धनंजय मुंडे हे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने सबंध वैद्यनाथ मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई व सुमारे 21 प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. या आकर्षक सजावटीमुळे सबंध वैद्यनाथ मंदिर व परिसर लखलखून निघाला असून भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी लागलेल्या दिसून येत आहेत. 
       सोवळ्या वस्त्रात धनंजय मुंडे वैद्यनाथ मंदिरात दाखल झाले व त्यांनी विधिवत पूजन करून वैद्यनाथ प्रभूंचे दर्शन घेतले. यावेळी वैद्यनाथ देवल कमिटीचे अध्यक्ष तथा परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे सचिव प्रा. बाबासाहेब देशमुख, अनिल तांदळे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, सुरेश टाक, राजेंद्र सोनी, अभयकुमार ठक्कर, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी आदी उपस्थित होते.



































*महाशिवरात्रीनिमित्त पंकजा मुंडे यांनी कुटुंबियांसमवेत घेतलं प्रभु वैद्यनाथ दर्शन* 


परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा

          महाशिवरात्रीच्या पावन-पर्वावर पंचम ज्योतिर्लिंग प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री पर्व साजरे केले जात आहे. या अनुषंगाने माजी मंत्री तथा भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी सहकुटुंब वैद्यनाथ मंदिरात जात प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

           यावेळी त्यांच्या समवेत मातोश्री प्रज्ञाताई मुंडे, बहीण खा. डॉ.प्रीतम मुंडे व त्यांचा मुलगा चि. अगस्त्य असे कुटुंबीय उपस्थित होते.वैद्यनाथ दर्शनानंतर त्यांनी मंदिर परिसरातील भाविक भक्तांशी हस्तांदोलन करत संवाद साधला. त्याचप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित साबुदाणा खिचडी वाटप स्टॉलवर हजेरी लावत दर्शनार्थी भाविकांना फराळ खिचडीचे वाटपही केले. यावेळी त्यांच्या समवेत भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





*महाशिवरात्र: जिरेवाडीहून श्री.सोमेश्वराचा पालखी सोहळा ज्योतिर्लिंग वैद्यनाथाच्या भेटीला!*


पंकजा मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे सहभागी: पालखीही वाहिली

परळी वैजनाथ, .....

    परळी वैजनाथ तालुक्यातील  जिरेवाडी येथील जागृत देवस्थान भगवान श्री सोमेश्वराचा पालखी सोहळा  मोठ्या ऊत्साहाने प्रभू वैद्यनाथाच्या भेटीला आला.या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत झाले. अनेक वर्षापासुनची परंपरा असलेला हा पालखी सोहळा अतिशय भव्यदिव्य स्वरुपात  निघाला. 


      या पालखी सोहळ्यात भजनी मंडळी, कलशधारी महीला, शाळकरी मुलांचे टिपरी, आणि लेझीमपथक यांसह गांवकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  सकाळी  सोमेश्वर मंदीर जिरेवाडी येथुन पालखीचे प्रस्थान होउन हा पालखी सोहळा जलालपुर  - शिवाजी चौक - एकमिनार चौक -    स्टेशनरोड -बाजार समिती - टॉवर - जगमिञ नागा मंदीर मार्गे वैद्यनाथ मंदीर येथे दुपारी पोहोचला.ठिकठिकाणी पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले तसेच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.  दरम्यान माजी मंत्री पंकजा मुंडे,खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी पालखीत सहभागी होउन सोमेश्वराचे दर्शन घेतले.














टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !