महिला महाविद्यालयात कायदेविषयक जागृती सत्र संपन्न

 महिला महाविद्यालयात  कायदेविषयक जागृती सत्र संपन्न 



परळी वैजनाथ दि.१३ (प्रतिनिधी)

  येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयातील  विशाखा कमिटीच्या वतीने एकदिवशीय कायदेविषयक जागृती सत्र संपन्न झाले .

      या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर पल्लवी पिंपळे या उपस्थित होत्या तर याप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून ॲड . प्राजक्ता दंडे मॅडम लाभल्या . , संस्थेच्या संचालिका मा . सौ छायाताई देशमुख तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ . विद्या देशपांडे यांची उपस्थिती लाभली .

     विद्येची देवता सरस्वती देवीच्या प्रतिमापूजनाने व दीप प्रज्वलनाने या  कार्यक्रमाचा प्रारंभ झाला .

प्रमुख वक्त्या ॲड प्राजक्ता दंडे यांनी आपल्या भाषणात स्त्रियांच्या सुरक्षेविषयीच्या विविध कायद्यांची माहिती उपस्थितांना  करून दिली .तसेच पितृधनात मुलींच्या वारसा हक्कालाही कसा कायदा संरक्षित करतो याचेही ज्ञान करून दिले . आणि त्यासोबतच अन्य धर्मातील मुलींनाही पित्याच्या संपत्तीत वारसा मिळावा यासाठी होत असलेल्या समान नागरी कायद्याबद्दलही थोडे विवेचन केले . तसेच कुटुंबात होणाऱ्या हिंसाचाराविरुद्धही मुलींनी गप्प न बसता त्याविषयी पोलीस यंत्रणेकडे दाद मागितली पाहिजे . त्यांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे तयार झालेले आहेत अशी माहिती त्यांनी दिली .

यानंतर आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ . प्रकृती पिंपळे यांनी मुलींना उन्हाळ्यात प्रकृतीची काळजी कशी घ्यावी याची सविस्तर माहिती दिली . महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . देशपांडे यांनी ही याप्रसंगी आपले विचार मांडले .

   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा डॉ संगिता कचरे यांनी केले तर  डॉ रागिणी पाध्ये यांनी आभार मानले . या कार्यक्रमासाठी महाविद्यालयांतील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्याप्रमाणावर उपस्थित होत्या .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार