महाजनको आयोजित खुल्या चित्रकला स्पर्धेत भेल संस्कार केंद्रातील मुलांचे घवघवीत यश

 महाजनको आयोजित खुल्या चित्रकला स्पर्धेत भेल संस्कार केंद्रातील मुलांचे घवघवीत यश


प्रतिनिधी (परळी वैजनाथ ) :

               येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित भेल संस्कार केंद्र एक अग्रक्रमाचे शिक्षण देणारी आणि एक जबाबदार नागरिक बनवणारी संस्था आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना प्रतिभावान बनविण्यास नेहमीच भर देत असते. संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे *"केल्याने होत आहे रे आधि केलेची पाहिजे"* या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये या गुणांची रुजवणूक करून त्यांना भारतीयत्वाचे शिक्षण देणारी परळी शहरातील नावलौकिक प्राप्त केंद्र बनली आहे.

   दि. ४ मार्च २०२४ पासून सुरु झालेल्या *"राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह"* अभियाना तर्फे महाजनको आयोजित घेण्यात आलेल्या *भव्य खुल्या चित्रकला स्पर्धेमध्ये* भेल संस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. नुकतेच अभियानाचा शेवट म्हणजे विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात भेल संस्कार केंद्रातील खालील विद्यार्थ्यांना आपापले कलाविष्कार सादर केल्यामुळे त्यांना गौरविण्यात आले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे .

*प्राथमिक विभाग*

प्रथम : कु. श्रुतिका श्रीनिवास मुरुडकर (५ वी)

द्वितीय : कु. सानवी पंकज अवचार (५ वी)

तृतीय : कु. राजश्री महादेव कराड (५ वी)


*हायस्कुल विभाग*

प्रथम : कु. यशश्री नवनाथ फड (८ वी)

द्वितीय : चि. नेतल धीरज भन्साळी (८ वी)

तृतीय : कु. आदिती सुनील बिरादार (७ वी)

वरील सर्व विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समिती, प्राचार्य आणि शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस अनंत शुभेच्या दिल्या अशी माहिती भेल संस्कार केंद्रातील प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रफुल्ल सर यांनी प्रसिद्धी माध्यमास माहिती दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !