परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

 ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर





शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांद्यापासून बांद्यापर्यंत शिवसेना ठाकरे गटाचे स्टार प्रचारक प्रचार करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. 


उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसह 40 जण करणार प्रचार


शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यादी प्रसिद्धीसाठी देण्यात आली. स्टार प्रचारकांमध्ये शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते अनंत गिते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, आमदार ॲड. अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू यांचा समावेश आहे.


आदेश बांदेकर, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंसह 40 समावेश


शिवसेना नेत्यांबरोबरच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विशाखा राऊत, नितीन बानुगडे-पाटील, लक्ष्मण वडले, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर, मनोज जामसुतकर, सुषमा अंधारे, संजय जाधव, किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, संजना घाडी, शीतल शेठ-देवरुखकर, जान्हवी सावंत, शरद कोळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार सुनील शिंदे, विलास पोतनीस, वैभव नाईक, नितीन देशमुख, आनंद दुबे, किरण माने, सुभाष वानखेडे आणि प्रियंका जोशी यांचाही या यादीमध्ये समावेश आहे.

ठाकरे गटाचे स्टार प्रचारक



• उद्धव ठाकरे


• आदित्य ठाकरे 


• संजय राऊत


• आदेश बांदेकर


• सुभाष देसाई


• अनंत गिते


• चंद्रकांत खैरे


• अरविंद सावंत


• भास्कर जाधव


• अनिल देसाई


• ॲड. अनिल परब


• राजन विचारे


• सुनील प्रभू


• अंबादास दानवे


• वरुण सरदेसाई


• रवींद्र मिर्लेकर


• विशाखा राऊत


• नितीन बानुगडे-पाटील


• लक्ष्मण वडले


• प्रियांका चतुर्वेदी


• सचिन अहिर


• मनोज जामसुतकर


• सुषमा अंधारे


• संजय जाधव


• किशोरी पेडणेकर


• ज्योती ठाकरे


• संजना घाडी


• शीतल शेठ-देवरुखकर


• जान्हवी सावंत


• शरद कोळी


• ओमराजे निंबाळकर


• सुनील शिंदे


• विलास पोतनीस


• वैभव नाईक


• नितीन देशमुख


• आनंद दुबे


• किरण माने


• सुभाष वानखेडे


• प्रियंका जोशी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!