जिल्ह्यात 1 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू

 जिल्ह्यात 1 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मनाई आदेश लागू

                                                             

            बीड, दि. 18 (जि. मा. का.) :- मराठा ओबीसी,धनगर व इतर समाजाचे विविध उपोषण,आंदोलने,सभा सद्या  सुरु असून जिल्हयात राजकीय हालचाली व घडामोडीमुळे मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने, रास्ता रोको या सारखे आंदोलने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लोकसभा निवडणूक 2024 आदर्श आचार संहिता चालू आहे. दि. 21 एप्रिल  2024 रोजी महावीर जयंती, दि. 23 एप्रिल 2024 रोजी हनुमान जयंती  आणि दि 1 मे 2024 रोजी महाराष्ट्र दिन संपन्‍ होत आहे. त्यामुळे  किरकोळ कारणावरुन तणाव निर्माण होऊन  जिल्हयात  कायदा व सुव्यवस्थेची शक्यता नाकारता येत नाही. कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी यासाठी  जिल्हादंडाधिकारी दिपा मूधोळ- मुंडे यांच्याकडून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत.


दिनांक 17 एप्रिल 2024 रोजीचे 00.01 वाजेपासून ते 1 मे 2024 रोजीचे 12.00 वाजेपर्यंत  बीड जिल्हयात या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा 37 (1) (3) अन्वये  काढण्यात येणा-या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे, निदर्शने, आंदोलने, धरणे आंदोलने यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहील. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहावी या करीता कलम 37 (1)  (3 ) अन्वये   मनाई आदेश जारी केला आहे.


 शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यां व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्यांच्या जवळपास खालील बाबीस मनाई करण्यात आली आहे.


या अन्वये शस्त्र, सोटे ,काठी, तलवार, बंदूक, लाठया, काठया, कोणतेही दाहक पदार्थ, किंवा स्फोटके, दगड, किंवा इतर क्षेपाणस्त्रे, शरीरास इजा होणा-या वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. आवेशी भाषणे, अंगविक्षेप, विडांबनात्मक नकल, सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षिता धोक्यात येईल, किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणतीही वस्तू जवळ बाळगू नये.

   जाहिरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुध्द असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचणार असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचणारी असेल, व्यक्तीच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती,किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन यासाठी मनाई आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही, मिरवणूका मोर्चे काढता येणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !