श्री योगानंद सरस्वती संस्थान आणि  उदगगिरी लायन्स उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने



मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

परळी/ प्रतिनिधी-

श्री योगानंद सरस्वती संस्थान, गुंज आणि  उदगगिरी लायन्स उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 4 एप्रिल रोजी श्रीक्षेत्र गुंज, ता. पाथरी जि. परभणी येथील भक्त निवास येथे मोफत नेत्रतपासणी व अल्पदरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

श्रीमत्‌ प .प.स.योगानंद सरस्वती स्वामी महाराज श्रीक्षेत्र गुंज संस्थान यांच्या 96 व्या पुण्यतिर्थी निमित्त डॉ.आर.एन.लखोटीया, अध्यक्ष उदयगिरी लॉयन्स, नेत्र रुग्णालय  उदगीर, यांच्या प्रमुख उपस्थितीत  व राजेशभाई  छनुभाई देसाई, वंशपारंपारिक  विश्वस्त  योगानंद सरस्वती संस्थान, गुंज खुर्द, ता पाथरी, जि. परभणी यांच्या संयोजनातून  श्रीक्षेत्र गुंज, ता. पाथरी जि. परभणी येथील भक्त निवास येथे  गुरुवार दि. 4 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10.30 ते दु. 3 वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व माफक दरात मोतिबिंदू शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 

दरम्यान,या शिबीरात श्री चिंतामणी एज्युकेशन ट्रस्ट संचलित  फाँउंडेशन स्कुल, परळी वै. यांच्या वतीने सौ.दीपीका जाधव व प्रा.श्री. तुकाराम जाधव संचलित गि गुंजन अंध कला पथक परळी  वैजनाथ  यांच्या वतीने भावगित व भक्ती गीतांचा भव्य  कार्यक्रम होणार आहे. गुंज खुर्द येथे होत असलेल्या शिबीराचा व भाव-भक्तीगीतांच्या कार्यक्रमाचा सर्व मोतिबिंदू रुग्णांनी व पंचक्रोशीतील भाविक भक्‍्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.  रुग्णांनी  नाव नोंदणीसाठी मोबा. 8788209309, 8010901496 या क्रमांकावर संपर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !