परळीतील दुय्यम निबंधक कार्यालयाचे योगेश गार्डन येथे स्थलांतर

 परळीतील दुय्यम निबंधक कार्यालयाचे योगेश गार्डन येथे स्थलांतर



परळी वैजनाथ, प्रतिनिधी

            परळी येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे योगेश गार्डन येथील नव्या जागेत स्थलांतर करण्यात आले आहे. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींना कार्यालयात येणे सोयीचे व्हावे. यासाठी दुय्यम निबंधक कार्यालय तळमजल्यावर असावे अशा प्रकारचे निर्देश देण्यात आले असल्याने परळी येथील हे कार्यालय योगेश गार्डन या ठिकाणी तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणी हे कार्यालय सुरू करण्यात आले असुन याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

       दुय्यम निबंधक कार्यालय तळमजल्यावर असणे बाबत शासनाचे पत्र क्र. आस्थाप-2021/1620/प्र.क्र.260/म-1 दि. 28/01/2022 नुसार  नोंदणी व मुद्रांक विभागाची जी दुय्यम निबंधक कार्यालये भाडयाच्या जागेत वरच्या मजल्यावर असून तेथे दिव्यांग अथवा वृद्ध व्यक्तिंना सहज पोहोचता येत नाही. तसेच ज्या ठिकाणी मुलभुत सोईसुविधा (उदा. प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, अभ्यागत कक्ष इ.) नाहीत अशी सर्व कार्यालये तळमजल्यावर घेण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करणेबाबत शासनाने संदर्भिय पत्रान्वये कळविले आहे. त्यानुषंगाने परळीतील दुय्यम निबंधक कार्यालय वरच्या मजल्यावर होते.  दुय्यम निबंधक कार्यालये तळमजल्यावर घेण्याच्या दृष्टीने  कार्यवाही करुन परळी येथील हे कार्यालय योगेश गार्डन या ठिकाणी तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आले आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन परळीचे दुय्यम निबंधक जे.टि.गवळी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !