श्रुती शांतलिंग फुटकेला आयआयटी रोपर पंजाब येथून पीएचडी प्रदान

 श्रुती शांतलिंग फुटकेला आयआयटी रोपर पंजाब येथून पीएचडी प्रदान


परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी)

           शहरातील शास्त्रीनगर भागातील रहिवासी श्रुती शांतलिंग फुटके-पाटील हिला आयआयटी रोपर पंजाब येथून नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली. याबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

             येथील शास्त्रीनगर भागातील रहिवासी, वैद्यनाथ बँकेतील पिग्मी एजंट शांतलिंग फुटके यांना एक मुलगा एक मुलगी असून आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असताना शिक्षणाचे महत्त्व जाणत दोन्ही मुलांना काटकसर करत शिक्षणासाठी आवश्यक खर्च केला.मुलांनीही आपल्या वडीलांचे कष्ट, मेहनत पाहून जबाबदारीने शिक्षण पूर्ण केले. मुलगा शुभमने इंजिनिअरिंग पूर्ण केले. व सध्या मुंबई येथे खाजगी कंपनीत नौकरी करत आहे तर मुलगी श्रुती हिने नुकतीच पीएचडी प्राप्त केली आहे. श्रुती चे शालेय शिक्षण न्यु हायस्कूल येथे, पाँलिटेकनीक शासकीय तंत्रनिकेतन लातूर येथे, बीई टि.बी.गिरवलकर आंबेजोगाई तर एमटेक गुरुगोविंदसिंह इंजिनिअरिंग काँलेज नांदेड ला पूर्ण केले. याच ठिकाणी काही दिवस तात्पुरती नौकरी केली. कारण याचवेळी भावाचे शिक्षण सुरू असल्याने वडील दोघांच्या शिक्षणाचा भार उचलू शकत नसल्याने हा निर्णय घेतला. याचवेळी परिक्षा दिल्या व पीएचडीसाठी आयआयटी रोपर पंजाब  येथे नंबर लागला. याठिकाणी इमेज प्रोसेसिंग आणि कॉम्प्युटर व्हिजन या विषयात डॉ सुब्रमण्यम मुरला यांच्या मार्गदर्शनाखाली

अतिशय मेहनतीने व कष्टाने पीएचडी पुर्ण केली. नुकताच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आय आयटी रोपर पंजाब येथे १२ वा दीक्षांत समारंभ  संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महिंद्र आणि महिंद्राचे माजी संचालक डॉ. पवन कुमार गोयंका होते. या दीक्षांत समारंभात डॉ.श्रुती शांतलिंग फुटके यांना इमेज प्रोसेसिंग आणि कॉम्प्युटर व्हिजन या विषयात पीएचडी देऊन सन्मानित करण्यात आले. मागच्या वर्षी तिने एक वर्षे आँस्ट्रोलिया येथे याच विषयाच्या संदर्भात अभ्यासक्रम पूर्ण केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार