परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष पारिजात पांडे यांची परळी वकील संघास सदिच्छा भेट

 महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष पारिजात पांडे यांची परळी वकील संघास सदिच्छा भेट



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष श्री पारिजात पांडे यांची परळी वकील संघास सदिच्छा भेट दिली.

       दिनांक२एप्रील रोजी परळी वकील संघात ॲड. पारिजात पांडे यांचा सत्कार परळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड प्रदीप गिराम यांनी शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केले. त्यांचे समवेत आलेले ॲड अनारसे साहेब,ॲड.कोळपे साहेब, अंबाजोगाई चे सरकारी ॲड.एल.बी.फड यांचाही सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर म्हणून ॲड.पारिजात पांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी ॲड एच.व्ही.गुट्टे, ॲड.प्रकाश मराठे, ॲड,डि.एल‌.उजगरे,ॲड.व्हि.एस.फड, ॲड.टि.के.गोलेर,ॲड.कडबाने, ॲड.एम.व्ही.मुंडे , ॲड.धुमाळ, ॲड.बी.डी.कराड,ॲड,देशमुख, ॲड. सातभाई, ॲड सोपान मुंडे, ॲड.गजानन पारेकर, ॲड.अश्विन साळवे,ॲड.संजय रोडे,ॲड,जेएल आंधळे,ॲड.राहुल सोळंके, ॲड.एम.एस.कराड, ॲड अर्जुन सोळंके,ॲड,सायस मुंडे, ॲड,सोनिया मुंडे,ॲड, कल्पना तौर, ॲड सोनेराव सातभाई, ॲड तिवारी,ॲड.जगतकर ,ॲड उजगरे बंधू, ॲड,डिघोळे ॲड.के.टी.आघाव व बहुसंख्य वकील मंडळी उपस्थित होती.याप्रसंगी ॲड गिराम यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन ॲड.दत्तात्रय आंधळे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!