शरद पवार बीड जिल्ह्यात घेणार तब्बल तीन सभा ; मराठवाड्यातील चार सभांपैकी तीन सभा बीडसाठी

 शरद पवार बीड जिल्ह्यात घेणार तब्बल तीन सभा ; मराठवाड्यातील चार सभांपैकी तीन सभा बीडसाठी




बीड |


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या प्रचार सभांचा झंजावात मराठवाड्यात सुरू होणार आहे. पुढील आठवड्याच्या 23 तारखेपासून शरद पवार हे मराठवाडा दौऱ्यावर येत असून 25 एप्रिल ते 11 मे दरम्यान शरद पवार यांच्या मराठवाड्यात चार सभा होणार आहेत. पैकी तीन सभा एकट्या बीड जिल्ह्यात तर एक सभा छत्रपती संभाजीनगरात होणार आहे.


बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव, बीड आणि अंबाजोगाई या तीन ठिकाणी शरद पवार सभा घेणार आहेत.शरद पवार, अजित पवार हे नेते बारामतीत अडकून पडल्याची टीका होत असतांना आता शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा जाहीर झाला आहे. या दौऱ्यात शरद पवारांच्या मराठवाड्यात चार सभा होणार आहेत. पैकी तीन सभा एकट्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी तर एक सभा छत्रपती संभाजीनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी होणार आहे.


25 एप्रिल रोजी शरद पवारांची पहिली सभा बीड लोकसभा मतदारसंघात माजलगाव येथे होणार आहे. त्यानंतर 1 मे ला छत्रपती संभाजीनगरात शरद पवार सभा घेणार आहेत. त्यानंतर 9 मे रोजी बीडमध्ये तर 11 रोजी अंबाजोगाईत सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठवाड्यात मतदानाचे तीन टप्पे असून पहिला टप्पा 26 एप्रिल रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचा आहे.


दुसरा टप्पा 7 मे ला असून धाराशीव, लातूर या दोन लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. शेवटचा टप्पा 13 मे ला असून जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या तीन मतदारसंघात या दिवशी मतदान होणार आहे. या दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार यासह काँग्रेस नेत्यांच्या सभाही मराठवाड्यात होणार आहेत.


शरद पवारांच्या मराठवाड्यातील सभा


25 एप्रिल बीड (माजलगाव)

1 मे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)

9 मे बीड

11 मे बीड (अंबाजोगाई)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !