श्रीराम नवमी निमित्त श्री गोराराम मंदिरात अध्यात्म रामायण व संहिता पारायण : नऊ दिवस चालणार धार्मिक कार्यक्रम

 श्रीराम नवमी निमित्त श्री गोराराम मंदिरात अध्यात्म रामायण व संहिता पारायण : नऊ दिवस चालणार धार्मिक कार्यक्रम

परळी वैजनाथ:  प्रतिनिधी...

 श्रीराम नवमी निमित्त  गणेशपार भागातील श्री गोराराम मंदिर येथे पारंपरिक पद्धतीने अध्यात्म रामायण व संहिता पारायण तसेच रामजन्मोत्सव सोहळा होणार आहे. या निमित्ताने नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.समर्थ रामदास स्वामी संस्थापित गोराराम मंदिर येथे दरवर्षी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

        या निमित्ताने पाडव्या पासून रामनवमीपर्यंत दररोज   रामायणाचार्य मनोहरबुवा जोशी कान्हेगावकर यांच्या वाणीतून अध्यात्म रामायण होणार आहे. सकाळच्या सत्रात सहिंता पारायण होणार आहे. त्याचबरोबर रामाचे नवरात्र साजरे केले जाणार आहेत.रामनवमी दिवशी  रामजन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.या जन्मोत्सव सोहळयास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वैद्यराज रामदासबुवा (दादा) रामदासी,लक्ष्मणबुवा रामदासी व नंदकुमार रामदासी यांनी केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !