इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

🌹अभिनंदन:गायन स्पर्धेत सुवर्णा जंगले प्रथम

 नियमित संगीत श्रवण केल्याने मन व शारीरीक आरोग्य निरोगी रहाते-डॉ.शालीनी कराड


सुरसंगम संगित विद्यालयाच्या गायन स्पर्धेत सुवर्णा जंगले प्रथम तर कल्पना गायकवाड द्वितीय

परळी (प्रतिनिधी)

 ज्या व्यक्तीला नियमितपणे संगीत ऐकण्याची,गायनाची आवड असते तो व्यक्ती मनाने प्रसन्न असतो.मन प्रसन्न असले तर शरीरही निरोगी रहाते यामुळे माणसाच्या जीवनात संगीताला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सामाजीक कार्यकर्त्या डॉ.शालीनी कराड यांनी सांगितले.सुरसंगम संगित विद्यालयाच्या वतिने घेण्यात आलेल्या गायनस्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.

 महिला दिनाचे औचित्य साधून सुरसंगम संगित विद्यालयाच्या वतिने येथील सुर्वेश्वर मंदिरात गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे उद्घाटन संगित विशारद ज्योती नागापुरे,सौ.सुकन्या पंचाक्षरी,सौ.अपर्णा कलशेट्टे,पत्रकार सुकेशिनी नाईकवाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.या स्पर्धेत एकुण 35 स्पर्धक महिलांनी सहभाग नोंदवला.यात सौ.सुवर्णा जंगले प्रथम,कल्पना गायकवाड द्वितीय तर अपर्णा ओपळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला शारदा मिसाळ,अंकिता सारडा,हेमा स्वामी यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.बक्षीस वितरण सामाजीक कार्यकर्त्या डॉ.शालीनी कराड,डॉ.प्रिया काकाणी,डॉ.मिरा लाहोटी,संतोष पंचाक्षरी,कपिल चौधरी,सुरसंगम संगित विद्यालयाची विद्यार्थीनी नेटल संजय शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.या गायन स्पर्धेत परीक्षक म्हणुन संगीत विशारद चंद्रकांत कळसे,ज्योती कुलकर्णी,संगीत अलंकार मनोहर मुंडे यांनी काम पाहिले.ही गायनस्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुरसंगम संगित विद्यालयाचे संचालक संचालक तुकाराम जाधव,सौ.दिपीका जाधव यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!