परळी तालुक्यात वीज पडली !

 अवकाळीचा तडाखा: परळी तालुक्यात वीज कोसळली; एक म्हैस दगावली



 परळी वैजनाथ, एमबी न्युज वृत्तसेवा...


       बीड जिल्ह्यात आज सर्वत्रच अवकाळी पावसाने झोडपून काढले असुन परळी तालुक्यातही सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यात परळी तालुक्यात वीज कोसळून एक म्हैस दगावल्याची घटना घडली आहे.

      परळी तालुक्यात कालपासूनच ढगांच्या गडगडात सोसाट्याचा वारा व विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस सुरू झाला असुन या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत करून टाकले आहे. आंब्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी रस्त्यावरील अनेक झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. तर घरावरील पत्रे व अन्य साहित्य उडून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान परळी तालुक्यातील खामगाव येथे आज वीज कोसळली. खामगाव येथील शरद प्रल्हाद बडे यांची म्हैस पाऊसात वीज  पडून दगावली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार