औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्प बचाव कृती समितीचे निवेदन

 परळी औष्णिक विद्युत केंद्र संच क्र.९ चे काम सुरू करण्यासाठी परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्प बचाव कृती समितीचे निवेदन




परळी /प्रतिनिधी


             येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात नवीन संच क्रमांक ९ सुरू करण्यासाठी शासनाने संच क्रमांक ८ च्या वेळी जमिन संपादित केली असून संच क्रमांक ८ कार्यान्वित झाला आहे. मात्र संच क्रमांक ९ च्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही ती सुरू करण्यासाठी परळीऔष्णिक विद्युत प्रकल्प बचाव कृती समितीच्या वतीने येथील बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता डॉ अनिल कोठये व उपविभागीय अधिकारी श्री. अरविंद लाटकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

               येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात सध्या संच क्रमांक ६,७,८ हे कार्यान्वित आहेत. या तीन संचातून ७५० मेगावँट विज निर्मिती केली जाते. येथील संच क्रमांक १ ते ५ बंद करुन स्क्रँप मध्ये काढण्यात आले आहेत. 

 २००७ मध्ये औष्णिक विद्युत केंद्र संच ८ व ९ साठी १२८ हेक्टर जमीन संपादित केलेली आहे. यातील संच क्रमांक ८ चे काम पूर्ण होवून  २०१६ मध्ये कार्यान्वित करण्यात आलेला आहे. परंतु संच क्र. ९ चे काम अद्याप सुरू झालेले नाही. हा संच सुरू झाल्यास परळीतील अनेक बेरोजगार तरुणांना कायमस्वरुपी रोजगार मिळू शकतो. तसेच उन्हाळ्यात अनेकवेळा पाण्याअभावी परळी औष्णिक विद्युत केंद्र बंद राहते. पाण्याची गरज भागविण्यासाठी जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडले जाते. हे पाणी कॅनॉलद्वारे सोडल्याने पाण्याची गळती होऊन बरेच पाणी वाया जाते, कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होते. तसेच कॅनॉल अनेक ठिकाणी नादुरूस्त असते, कॅनॉलच्या परिसरातील अनेक शेतकरी अवैधरित्या आपल्या सोयीसाठी हे पाणी वापरतात. याचा फटका औष्णिक विद्युत केंद्राला बसतो. यावर उपाय म्हणून परळी केंद्रास ६० कि.मी. पाईपलाईन द्वारे सुरक्षित पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने माजलगाव येथील धरणातून कायमस्वरुपी पाईपलाईनद्वारे पाणी आणता येते यासाठी जो खर्च लागणार आहे, डी.पी.आर. २०२१ मध्येच मंजूरीसाठी मुंबईच्या मुख्य कार्यालयात पाठविण्यात आलेला आहे. त्याची अंदाजित रक्कम २९० कोटी आहे. तरी आपण या बाबीचा विचार करून माजलगाव येथून पाईपलाईनद्वारे खडका येथील बंधाऱ्यात ६० कि.मी. अंदाजित रक्कमेस मान्यता देवून काम सुरू करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात करावी. यासाठी परळी औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्प बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या अध्यक्षपदी भगवान साकसमुद्रे, सचिव अँड मनोज संकाये निवड करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने मंगळवारी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर व औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता डॉ अनिल कोठाये यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उर्जा मंत्री, पालकमंत्री बीड, महाव्यवस्थापकीय संचालक महानिर्मिती, जिल्हाधिकारी यांना मेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !