जाती-पातीच्या राजकारणापेक्षा 'ताई' चं नेतृत्व सर्वसमावेशक - आडसकर, सोळंके, जगताप

 पंकजाताई मुंडेंच्या झंझावती दौर्‍याने धारूर डोंगर पट्ट्यात कमळाचे वादळ




ताई, तुम्ही चिंता करू नका शंभर टक्के मतदान देऊ ;  विविध गावच्या ग्रामस्थांनी दिला शब्द


जाती-पातीच्या भिंती उभा करणार्‍याच्या मागे जाऊ नका मतदान रूपी कर्ज द्या, महाविकासाच्या रूपाने परतफेड करू - पंकजाताई मुंडे


जाती-पातीच्या राजकारणापेक्षा 'ताई' चं नेतृत्व सर्वसमावेशक - आडसकर, सोळंके, जगताप


तेलगाव ।दिनांक १६। 

भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजाताई  मुंडे यांनी निवडणूक प्रचारार्थ आज धारूर डोंगर पट्ट्यात झंझावती दौरा केल्याने कमळाचे वादळ गावा-गावात निर्माण झाले. हिंगणी खुर्द ते चारदरी पर्यंत एका दिवसात तब्बल १२ गावांचा दौरा केला. ठिक-ठिकाणी उत्स्फुर्त स्वागत करताना फटाक्यांची आतिशबाजी गुलाल, पुष्पांची उधळण अनेक गावात महिलांनी औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या.  दरम्यान जाती-पातीच्या भिंती उभा करणार्‍याच्या मागे जावू नका माझे राजकारण केवळ जनसामान्यांच्या विकासासाठी आहे. मला तुम्ही मतदान रूपी कर्ज द्या, विकासाची महागंगा आणून परतफेड केल्याशिवाय राहणार नाही. पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी हेच नेतृत्व बसणार त्यामुळे हक्कानं जिल्ह्याचं भाग्य उजळण्यासाठी मी रात्रंदिवस केवळ विकास योजना घेवून आल्याशिवाय राहणार नाही. विकासासाठी लढणारा शिपाई मी असून सेवकाच्या भूमिकेत आहे. संधी मिळाल्यानंतर हक्काची खासदार म्हणून सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितलेे. 


   दौर्‍यात सोबत असणारे भाजपा नेते रमेश आडसकर, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जयसिंग भैय्या सोळंके आणि भाजपा नेते मोहन जगतापांनी बोलताना सांगितले की, ताई हे नेतृत्व केवळ विकासाचं असून जाती-पातीचं राजकारण कोणीच करता कामा नये शंभर टक्के बुथ आम्ही तुमच्या पाठीमागे उभा करून दाखवू असा दावा केला. 

महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडेंनी आज दिवसभर धारूर डोंगर पट्ट्यातील हिंगणी (खु.), हिंगणी (बु), कांदेवाडी, कासारी, बोडखा, भोगलवाडी, गावंदरा, आंबेवडगाव, चौंडी, सोनीमोहा, जहांगीर मोहा, चारदरी आदी गावात झंझावती दौरा करत ग्रामिण भागातील मतदारांची मने जिंकली.  प्रत्येक गावात उत्स्फुर्त स्वागत लोकांनी केले. विशेष म्हणजे त्यांना आशिर्वाद देण्यासाठी महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणावर दिसून आली. ताई, आम्ही तुम्हाला शंभर टक्के मतदान करून दाखवू असा निर्धार ग्रामस्थांनी बोलून दाखवला. दौर्‍यात कुठेही जाती-पातीचा रंग दिसला नाही. मराठा गावात उत्स्फुर्त स्वागत आणि ग्रामस्थांची चेहरे शंभर टक्के मतदान देवू असे दिसून आले. 


  याप्रसंगी ठिक-ठिकाणी बोलताना पंकजाताई म्हणाल्या,मी तुमच्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी आले आहे. उमेदवार म्हणून योग्य वाटते का? असा सवाल करताच सभेतून आलेला हो.. हा माझ्यासाठी उत्साह वाढविणारा आहे. सर्वोच्च नेत्यांनी मला निवडणूक लढविण्याचा आदेश दिला. पालकमंत्री असताना गावच्या सरपंचाला देखील कधी मी त्रास दिला नाही. प्रत्येक गावात माझ्या विकासाच्या योजना पोहोंचल्या असून मी नेहमीच शुद्ध कर्माने राजकारण करत आले. सामान्य माणसाच्या हक्काचे रक्षण माझ्या हातून नेहमीच झालं. घरकुल वाटपात देखील कधी भेदभाव केला नाही. मुंडे साहेबांच्या पुण्याईमुळे राजकीय प्रतिष्ठा माझी मोठी असून अंबानी, अदानी उद्योगपतींकडून आपल्या जिल्ह्यात एखादा मोठा उद्योग घेवून येईल आणि दहा हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देईल. कँन्सर सारखं आधुनिक हॉस्पिटल मला जिल्ह्यात उभा करून सामान्य जनतेच्या आरोग्याच रक्षण मला करायचं आहे. पालकमंत्री  पदाच्या काळात हजार कोटी पेक्षा जास्त शेतकर्‍यांना विमा मिळवून दिला. सर्व प्रकारचे अनुदान रोज बँकेत जमा व्हायचे ही माझ्या शुद्ध कर्माची पुण्याई असल्याचे सांगुन आता चांगली नितीमत्ता आणि प्रामाणिक राजकारण करणार्‍या नेतृत्वाला संधी द्या. शेतकर्‍यांचे प्रश्‍न असो किंवा सामान्य जनतेचे मी संसद गाजवल्याशिवाय राहणार नाही. जाती-पातीचं राजकारण माझ्या रक्तात कधीच नाही. त्यामुळे आपल्या जिल्ह्याच भाग्य उजळण्यासाठी मला तुम्ही मतदान रूपी कर्ज द्या मी विकासाच्या रूपाने परतफेड केल्याशिवाय राहणार नाही. असे त्यांनी सांगितले.


_*आडसकर, सोळंके, जगतापांचे आवाहन*_

-------

भाजपा नेते रमेश आडसकर, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जयसिंग भैय्या सोळंके, विधानसभा प्रमुख मोहन जगताप भाषणात म्हणाले की, जाती-पातीच राजकारण करणार्‍या विरोधकांच ऐकून आपलं नूकसान होवू शकतं. लोकसभा निवडणूक राष्ट्रीय प्रश्‍नावर असून सत्तर वर्षात जेवढा विकास झाला नाही. पालकमंत्री म्हणून पंकजाताईंनी आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकला. निवडणूकीनंतर हे नेतृत्व केंद्रात मंत्री होणार ज्यामुळे विकासाची गंगा जिल्ह्यात येवू शकते. बजरंग सोनवणे हे उमेदवार धोकाधडी करणारे असून मागच्या निवडणूकीत पाच लाख मते मिळाली. पण हा माणूस कुठल्या बिळात लपून बसला असा सवाल त्यांनी केला. जनतेच्या सुख दुखात कधीच न येणार्‍या सोनवणेंना आता मतदान मागण्याचा अधिकार नसल्याचे यांनी सांगितले.


या दौर्‍यात भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी, निर्मळ तात्या, राजेभाऊ मुंडे, बालासाहेब तिडके, नंदकुमार सोळंके, संजयराव सोळंके, दिपक सोळंके, बिभिषण शेंडगे, मधुकर माने, शिवाजी मुंडे, बालासाहे चोले, दिलीप सोळंके, छगनबप्पा सोळंके, सोमनाथ बडे, सुग्रीव तिडके यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते ठिक-ठिकाणी उपस्थित होते. एकाच झंझावती दौर्‍याने डोंगरपट्ट्यात पंकजाताईंची हवा निर्माण झाली असून कमळ एके कमळ आणि शंभर टक्के बुथ अस चित्र दिसून आले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !