बीड तालुक्यातील मतदारांच्या प्रितमताई मुंडे यांनी घेतल्या भेटी

 पंकजाताई मुंडे यांनी केलेला विकासच विजयाची नांदी ठरणार ; सन्मानजनक मताधिक्यासाठी परिश्रम घ्या


खा. प्रितमताई मुंडे यांचे मांजरसुंभा,लिंबा गणेश, ढेकनमोह गणातील पदाधिकाऱ्यांना आवाहन


बीड तालुक्यातील मतदारांच्या प्रितमताई मुंडे यांनी घेतल्या भेटी


बीड | दि. १६ | बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जवाबदारी सांभाळत असताना पंकजाताई मुंडे यांनी अभूतपूर्व विकास निधी आणला होता, तेंव्हापासून आजपर्यंत केलेली लोकाभिमुख विकासकामे हीच पंकजाताईंच्या विजयाची नांदी ठरणार आहेत, पंकजाताईंचा विजय त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे निश्चित आहे. या विजयात पंकजाताईंच्या उंचीला शोभेल असे मताधिक्य देऊन पंकजाताईंना सन्मानजनक विजय मिळवून देण्यासाठी परिश्रम घ्या असे आवाहन खा.प्रितमताई मुंडे मांजरसुंभा,लिंबा गणेश, ढेकनमोहा गणातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले.


भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारासाठी मांजरसुंभा, लिंबा गणेश,ढेकनमोहा पंचायत समिती गणातील बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला संबोधित करताना खा.प्रितमताई मुंडे बोलत होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, योगेश क्षीरसागर, शिवसेनेचे अनिल जगताप, सचिन मुळूक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. 


लोकसभेची निवडणूक आपण विकास कामांच्या बळावर आणि भविष्याच व्हिजन घेऊन लढवत आहोत, यापूर्वी पंकजाताईंच्या नेतृत्वात आपण बीड जिल्ह्यात अभूतपूर्व विकासकामे केली आहेत.  आपण केलेला विकास हाच आपला विजय आहे. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, काही कामे प्रलंबित राहिली असतील तर आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लावू, याकरिता केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेला खासदार आपल्याला प्रतिनिधी म्हणून निवडायचा आहे. आपल्या भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण केलेली विकास कामे पोहोचवा, प्रत्येक गावात प्रचारफेरी काढा, आपल्या बूथवर मागील मताधिक्यापेक्षा अधिक मतदान पंकजाताईंना मिळेल यासाठी मेहनत घ्या असे आवाहन याप्रसंगी खा.प्रितमताई मुंडे यांनी केले. 


दरम्यान बीड तालुक्यातील बोरफडी,जुजगव्हाण येथील सप्ताहांना भेटी देऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच मौज आणि जरुड आणि बीड शहरातील मतदारांच्या भेटी घेऊन पंकजाताई मुंडे यांना अधिकाधिक मताधिक्य देण्याचे आवाहन खा. प्रितमताई मुंडे यांनी केले. भाजप नेते सर्जेराव तांदळे, नवनाथ शिराळे,देविदास नागरगोजे,चंद्रकांत फड, सलीम जहांगीर,अजय सवाई, संग्राम बांगर यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 


•••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार