उद्पायासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू

 जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला संपूर्ण यंत्रणेचा आढावा



उद्पायासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू

    

बीड ,दि. 17 (जिमाका) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुका सुरू झाल्या आहेत.  39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार दिनांक 13 मे रोजी मतदान होणार असून यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवार दिनांक 18 एप्रिल (आज) पासून सुरुवात होणार आहे. या धर्तीवर आज जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी करून आढावा घेतला. 


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत केकान, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर चिंचाणे यावेळी उपस्थित होते. 18 एप्रिलपासून  25 एप्रिल पर्यंत 11 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन कार्यालयात नामनिर्देशन पत्र निशुल्क दिले जातील. या ठिकाणीची पाहणी केली.  उद्यापासून या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थेची माहिती जाणून घेतली. या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे खर्च निरीक्षक बसणार असून त्यांच्या पक्षाची पाहणीही त्यांनी यावेळी केली. 


या कार्यालयाच्या बाजूला असणारे जिल्हा माहिती केंद्र (नॅशनल इंफॉर्मेशन सेंटर) येथे असणारे सीव्हीजील कक्ष आणि सायबर कक्ष याची देखील पाहणी जिल्हादंडाधिकारींनी केली. 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधकाम सुरू असून उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल होणार असल्यामुळे कायदा सुव्यवस्थे बाबतही प्रत्यक्ष पाहणी केली. नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांसोबत पाच लोक असतील तसेच  तीन वाहनांना परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी योग्य व्यवस्था असावी, असे, निर्देश त्यांनी यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयात तळमजल्यावर सहा विधानसभा मतदार संघ निहाय  अद्यावत मतदार याद्या ठेवण्यात आलेल्या आहेत. लोकसभा मतदारसंघात उभे असणारे उमेदवारांकरिता 'निदेशक पुस्तिका 2023' ही मराठी तसेच उपलब्ध असणार आहे याची स्वतः खातरजमा जिल्हाधिकारी यांनी यावेळी केली. बाहेरून येणाऱ्या निरीक्षकांसाठी अपेक्षित साहित्य, उमेदवारांना आवश्यक असणारी माहिती, त्यांच्या मदतीला असणारे सहाय्यक त्यांना लागणारी माहिती याचा ही आढावा घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !