सलग दोन घटना :शालेय विद्यार्थिनींच्या अपहरणाने पालकांत भितीचे वातावरण

 सलग दोन घटना :शालेय विद्यार्थिनींच्या अपहरणाने पालकांत भितीचे वातावरण




परळी वैजनाथ, प्रतिनिधी
     शालेय विद्यार्थिनींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून परळी शहरात सलग दोन घटना घडल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शाळकरी मुलींचे अपहरण होत असल्याच्या घटनांनी पालकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक 30 रोजी थर्मल काॅलनी मधील एका शाळेच्या विद्यार्थिनीच्या अपहरणानंतर आता कंडक्टर कॉलनीतील एका मुलीचे अपहरण झाल्याच्या घटनेची नोंद पोलिसात झाली आहे या अपहरणाच्या घटनांनी एकच खळबळ उडाली आहे.
          याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील शक्तीकुंज वसाहतीत इयत्ता आठवीत  शिक्षण घेणारी विद्यार्थिनी 30 मार्च रोजी सकाळी 10 नंतर अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेले.सदर मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 363 भादवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या घटनेत कंडक्टर कॉलनी येथील एका शाळकरी मुलीचे अपहरण झाले असल्याची फिर्याद या मुलीच्या आईने पोलिसा केली आहे त्यावरूनही संभाजीनगर पोलीस सर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
    दरम्यान या घटनेने परळी शहरात पालकवर्गात खळबळ उडाली आहे.याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार