बुलढाणा, परभणी मतदारसंघात

 भाजपच्या स्टार प्रचारक पंकजाताई मुंडे यांच्या उद्या बुलढाणा,  परभणी मतदारसंघात जाहीर सभा

स्वतः उमेदवार म्हणून बीडचा प्रचार सांभाळत पक्षाच्या अन्य उमेदवारांना निवडून आणण्यासाठीही योगदान

परळी ।दिनांक २२।भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव व भाजपाच्या स्टार प्रचारक असलेल्या पंकजाताई मुंडे या स्वतः बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीच्या उमेदवार आहेत. सध्या बीडमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.मात्र स्वतः उमेदवार म्हणून बीडचा प्रचार सांभाळत पक्षाच्या इतर ठिकाणच्या अन्य उमेदवारांना निवडून आणण्यासाठीही पंकजाताई मुंडे यांचे विशेष योगदान असणार आहे. याच अनुषंगाने आज दिनांक 23 रोजी परभणी व बुलढाणा या मतदारसंघात पंकजाताई मुंडे यांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

        बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे यांची सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड या ठिकाणी सकाळी 11 वाजता जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ दुपारी 2.10 वाजता जिंतूर जिल्हा परभणी येथे जाहीर सभा होणार आहे .या दौऱ्यासाठी पंकजाताई मुंडे सकाळी 11.00 परळी वैजनाथ येथुन हेलिकॉप्टरने दुसरबीड ता. सिंदखेडराजा जि बुलढाणाकडे रवाना होतील. दुपारी 11.40 दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि बुलढाणा येथेश आगमन व जाहीर सभा दुपारी 01.45 दुसरबीड ता. सिंदखेडराजा, जि बुलढाणा येथुन हेलिकॉप्टरने जिंतुर, जि. परभणीकडे रवाना दुपारी 02.10 जिंतुर, जि. परभणी येथे आगमन व कार्यकर्ता मेळाव्यास उपस्थिती स्थळ - राधाकृष्ण मंगल कार्यालय, जिंतुर दुपारी 04.00 जिंतुर, जि. परभणी येथुन हेलिकॉप्टरने परळी वैजनाथकडे रवाना सायं 04.25 परळी वैजनाथ येथे आगमन व राखीव असा दौरा कार्यक्रम असणार आहे.

        भाजपाने या लोकसभा निवडणुकीत ४०० पार चे उद्दिष्ट ठेवलेले असून प्रत्येक ठिकाणचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी सर्वच नेतेमंडळी व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. कोणत्याही निवडणुकीत जीव तोडून काम करण्याची पंकजाताई मुंडे यांची पद्धत व पक्षादेश शिरसावंद्य मानून पक्षाकडून दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी पंकजाताई मुंडे नेहमीच अग्रेसर असतात. लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या महाराष्ट्रातील त्या स्टार प्रचारक असून महाराष्ट्रभरातील अन्य उमेदवारांसाठी प्रचार त्या करणार आहेत. याच अनुषंगाने पंकजाताई मुंडे यांची आज बुलढाणा व परभणी मतदार संघात जाहीर सभा होत आहे.

••••





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार